पोलाजी यांचा मुंबई-खेरवाडीत सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 04:18 PM2017-10-05T16:18:59+5:302017-10-05T16:18:59+5:30
नॅशनल सोसायटी फॉर क्लिन सिटीज इंडियाचे मानद कलासंचालक सा. भ. पोलाजी यांचा मुंबई-खेरवाडी बांद्रा येथील झोपडपट्टीतील ४५ वर्षांपूर्वीच्या विद्यार्थ्यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
सावंतवाडी : नॅशनल सोसायटी फॉर क्लिन सिटीज इंडियाचे मानद कलासंचालक सा. भ. पोलाजी यांचा मुंबई-खेरवाडी बांद्रा येथील झोपडपट्टीतील ४५ वर्षांपूर्वीच्या विद्यार्थ्यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
‘चिल्ड्रेन्स कॉम्प्लेक्स’च्या सभागृहात हा सत्कार सोहळा पार पडला. पोलाजी यांचा कुलसुम दुभाष यांच्या हस्ते मानपत्र, शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. पोलाजी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल अलियावर जंग यांच्या संकल्पनेतील स्वच्छता, पर्यावरण, नागरिकता याबाबत झोपडपट्टीतील हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून यशस्वी केले. त्यांच्या या कार्याबद्दल या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी व्यंगचित्रकार वाईरकर, चित्रकार राम नाबर, लेखक भालचंद्र झा, डॉ. राजेश्वरी, लिंगामणी गामल, जयवंती कामत, संजय सावंत, संजय त्रिंबककर, बापू सर्वगोड, शिल्पकार गणेश क्षीरसागर, संदीप साळगावकर, विजया पारकर यांच्यासह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.