आंबोलीतील पर्यटन स्थळावर फिरणाऱ्या १५ जणांना पोलिसांचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 12:35 PM2021-06-14T12:35:27+5:302021-06-14T12:39:29+5:30
CoronaVIrus Amboli Hill Station Sindhudurg : आंबोली येथील पर्यटन स्थळे बंद असताना आंबोली धबधबा परिसर तसेच परिसरातील अन्य ठिकाणी गर्दी करणाऱ्या १५ हून अधिक पर्यटकांवर येथील पोलिसांनी कारवाई केली.या कारवाईत सातत्य ठेवण्यात येणार असल्याने पर्यटकांनी सुद्धा सहकार्य करावे,असे आवाहन आंबोली पोलीस ठाण्याचे हवालदार दत्ता देसाई यांनी केले आहे.
आंबोली : येथील पर्यटन स्थळे बंद असताना आंबोली धबधबा परिसर तसेच परिसरातील अन्य ठिकाणी गर्दी करणाऱ्या १५ हून अधिक पर्यटकांवर येथील पोलिसांनी कारवाई केली.
या कारवाईत सातत्य ठेवण्यात येणार असल्याने पर्यटकांनी सुद्धा सहकार्य करावे,असे आवाहन आंबोली पोलीस ठाण्याचे हवालदार दत्ता देसाई यांनी केले आहे.
कोरोनाच्या काळात आंबोलीत येणाऱ्या पर्यटकांना रोखण्यासाठी ग्रामपंचायत व कृती समितीने पोलिसांना पत्र दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे, असे देसाई यांनी सांगितले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे रुग्ण वाढत असताना आंबोली पर्यटन स्थळावर मात्र गर्दी होत आहे.त्यामुळे पर्यटकांना रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.