शाळांच्या परिसरात फिरणाऱ्या बुरखाधारी महिलांबाबत पोलिसांचे वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 02:26 PM2019-10-07T14:26:02+5:302019-10-07T14:30:35+5:30
बांदा शहरातील शाळांच्या परिसरात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या बुरखाधारी अनोळखी महिला निदर्शनास पडण्याच्या घटना घडत आहेत. विद्यार्थी तसेच शिक्षकांनीही या बुरखाधारी महिलांना पाहिले आहे. या घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी शनिवारी बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी शहरातील शाळांमध्ये प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालकांशी त्यांनी थेट चर्चा केली.
बांदा : शहरातील शाळांच्या परिसरात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या बुरखाधारी अनोळखी महिला निदर्शनास पडण्याच्या घटना घडत आहेत. विद्यार्थी तसेच शिक्षकांनीही या बुरखाधारी महिलांना पाहिले आहे. या घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी शनिवारी बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी शहरातील शाळांमध्ये प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालकांशी त्यांनी थेट चर्चा केली.
विद्यार्थी तसेच शिक्षकांना गेले बरेच दिवस या महिला निदर्शनास पडत आहेत. बांदा पोलिसांनी शाळा परिसरात बंदोबस्त वाढवावा तसेच शाळा सुटण्याच्या वेळेत पेट्रोलिंग करावे, अशी मागणी एका शाळेचे मुख्याध्यापक व स्थानिक ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्याकडे लेखी निवेदन देऊन केली.
विद्यार्थी व शिक्षक यांच्या चौकशीअंती त्या दोन महिला असून मराठी बोली भाषेवरून त्या स्थानिक असाव्यात असा प्राथमिक अंदाज जाधव यांनी व्यक्त केला आहे. याचा उलगडा त्या महिलांना पडकल्यानंतरच होऊन त्यांचा उद्देश काय असेल? हे समजू शकेल. यासाठी स्थानिकांनी सतर्क राहणे ग्ररजेचे आहे. शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी घाबरून जाऊ नये. पोलीस प्रशासन आपल्यासोबत
आहे, असा विश्वासही जाधव यांनी दिला.
अनोळखी व्यक्ती किंवा महिला दिसल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क करावा. अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही अनिल जाधव यांनी केले. शाळा प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरा शाळा परिसरात बसवावा, अशी सूचनाही त्यांनी केली.