पोलीस पाटलांनी आपले अस्तित्व निर्माण करावे
By admin | Published: May 22, 2014 12:46 AM2014-05-22T00:46:47+5:302014-05-22T01:02:01+5:30
उपस्थित पदाधिकार्यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा
चिपळूण : पोलीस पाटील हा ग्रामस्थ व पोलीस यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. गावात घटना घडल्यानंतर पोलीस जागेवर पोहचेपर्यंत पोलीस पाटलांनी महत्त्वाची जबाबदारी उचलावी. सर्वांनी एकत्र येवून संघटना अधिक मजबूत करावी. प्रशासकीय बैठकीला हजर राहून अधिक माहिती घ्यावी. त्यामुळे काम करणे सोपे होते असे आवाहन पोलीस निरीक्षक उत्तम जगदाळे यांनी केले. चिपळूण येथील पोलीस वसाहतीमध्ये असलेल्या बहुउद्देशीय सभागृहात पोलीस पाटील संघटनेचे वार्षिक स्नेहसंमेलन आज (बुधवार) झाले. यावेळी पोलीस निरीक्षक जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक चित्रा मढवी, हवालदार दीपक ओतारी उपस्थित होते. यावेळी संघटनेचे अध्यक्ष मोहन देवरुखकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर उपस्थित पदाधिकार्यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी सेवानिवृत्त झालेल्या पोलीस पाटलांचा पोलीस निरीक्षक जगदाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष देवरुखकर, उपाध्यक्ष सुभाष नलावडे, बाळकृष्ण कदम, अनंत चिखलकर, मानसी पवार, दिलावर खडपोलकर यांच्यासह पोलीस पाटील संघटनेच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)