कार्यरत पोलिसांनाच पर्यटन पोलिसांचा दर्जा, पोलीस महानिरिक्षक नवल बजाज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 09:17 PM2018-04-19T21:17:57+5:302018-04-19T21:17:57+5:30
भविष्यात सिंधुदुर्गचे पर्यटन अधिक वाढणार आहे, हे लक्षात घेऊन सध्या पोलीस दलात असलेल्या काहि पोलीस कर्मचाºयांना तसेच अधिका-यांना पर्यटन पोलीस म्हणून प्रशिक्षीत करून दर्जा देण्यात येणार आहे. तशी प्रकिया ही सुरू झाली आहे.
सावंतवाडी - भविष्यात सिंधुदुर्गचे पर्यटन अधिक वाढणार आहे, हे लक्षात घेऊन सध्या पोलीस दलात असलेल्या काहि पोलीस कर्मचाºयांना तसेच अधिका-यांना पर्यटन पोलीस म्हणून प्रशिक्षीत करून दर्जा देण्यात येणार आहे. तशी प्रकिया ही सुरू झाली आहे. त्यासाठी स्वतंत्र्य पोलीस ठाणे किंवा पर्यटन गाड्या असणार नाहीत, अशी माहिती कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक नवल बजाज यांनी दिली. ते सावंतवाडी येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी आंबोलीसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आल्याचेही जाहीर केले.
कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक नवल बजाज हे गुरूवारी सावंतवाडीत आले होते. यावेळी त्यांनी येथील पोलिसांच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड, पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस, सावंतवाडी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे आदी उपस्थित होते.
महानिरीक्षक बजाज म्हणाले, सागरी महामार्गावर सध्या तरी कोणतेही स्वतंत्र पोलीस ठाणे करण्याचा प्रस्ताव आमच्यापर्यंत आला नाही. मात्र मध्यंतरी आंबोलीत घडलेल्या काही घटनांना बघता येणाºया पर्यटकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून आंबोलीत स्वतंत्र पोलीस ठाणे उभारण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव जिल्ह्यातून शासनाला पाठवण्यात आला आहे. या एकमेव पोलीस ठाण्याचा प्रस्ताव असून, सध्या तरी सागरी महामार्गावर कोणतेही पोलीस ठाणे नसल्याचा खुलासा बजाज यांनी केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पर्यटन भविष्यात वाढणार आहे. त्यामुळे येथे पर्यटन पोलीस असावेत. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या काही पोलीस अधिका-यांना तसेच कर्मचा-यांना पर्यटन पोलिसांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने जिल्ह्यात येणाºया पर्यटकांशी त्या पोलिसांनी कसे बोलावे तसेच त्यांची मदत कशी करावी यांचे प्रशिक्षण प्रामुख्याने असणार आहे. यासाठी मुंबईच्या धर्तीवर कोणत्याही प्रकारे स्वतंत्र गाडी किंवा स्वतंत्र पर्यटन पोलीस ठाणे असे असणार नाही, असे बजाज यांनी स्पष्ट केले.
कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक गोवा व महाराष्ट्र या तीन्ही सीमावर्थी जिल्ह्यातील पोलिसांची बॉर्डर परिषद झाली आहे. यात गुन्हेगारीबाबत काही मुद्दे चर्चेत आले आहेत. तसेच कर्नाटक निवडणुकीवेळी कोल्हापूर, सिंधुदुर्ग पोलिसांनी कशी मदत करावी याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच तपासणी नाके कुठे असावेत याचीही माहिती देण्यात आली असल्याचे बजाज यांनी सांगितले.
सिंधुदुर्गात येणाºया पर्यटकांच्या गाड्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी तपासल्या जातात. यात पोलिसच नाही तर इतर विभागाचे अधिकारी या गाड्या तपासतात. मात्र यापुढे आम्ही यात आणखी पारदर्शकता आणू कारण ज्या प्रकारे गोव्यात पर्यटक येतात तसेच पर्यटक भविष्यात जिल्ह्यात येणार आहेत. त्यामुळे येणाºया पर्यटकांना अधिक सुरक्षित वाटावे तसेच त्यांना पोलिसांकडून कोणत्या अपेक्षा आहेत, याची माहिती घेऊन आम्ही तसे काम करू, असे यावेळी बजाज यांनी सांगितले.