Sindhudurg: वित्तीय कंपनीच्या फसवणुकीला पोलिस जबाबदार, सत्तेतील बड्या नेत्यांचे नाव सांगून फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 12:29 PM2024-02-22T12:29:23+5:302024-02-22T12:29:46+5:30

सावंतवाडी : वित्तीय कंपनीच्या फसवणुकीविरोधात आम्ही तक्रारी तसेच आवश्यक पुरावे दिलेले असतानासुद्धा सावंतवाडी पोलिसांनी कोणतीही दखल न घेता उलट ...

Police responsible for fraud of financial company, fraud by naming big leaders in power | Sindhudurg: वित्तीय कंपनीच्या फसवणुकीला पोलिस जबाबदार, सत्तेतील बड्या नेत्यांचे नाव सांगून फसवणूक

Sindhudurg: वित्तीय कंपनीच्या फसवणुकीला पोलिस जबाबदार, सत्तेतील बड्या नेत्यांचे नाव सांगून फसवणूक

सावंतवाडी : वित्तीय कंपनीच्या फसवणुकीविरोधात आम्ही तक्रारी तसेच आवश्यक पुरावे दिलेले असतानासुद्धा सावंतवाडी पोलिसांनी कोणतीही दखल न घेता उलट त्या कंपनीला क्लीन चिट दिली. त्यामुळेच अनेकांची फसवणूक झाली, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ मंत्री प्रवीण भोसले, अर्चना घारे-परब यांच्याकडून आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे.

तसेच या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सत्तेतील मोठ्या नेत्यांचे नाव घेऊन पैसे जमा केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यावेळी पुंडलिक दळवी, अॅड. सायली दुभाषी, सावली पाटकर, हिदयतुला खान आदी उपस्थित होते.

सावंतवाडीत एका एंटरप्रायझेसच्या नावाखाली वित्तीय कंपनीचे कार्यालय थाटून अनेकांची फसवणूक करणारी कंपनी पळून गेली आहे. या पार्श्वभूमीवर घारे यांनी पोलिस यंत्रणेला जबाबदार ठरवले आहे. वित्तीय संस्थेचे दुकान थाटलेल्या कंपनीने अनेकांना गंडा घातला आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर प्रथमच त्यांना राष्ट्रवादीच्या माध्यमातून रोखण्यात आले होते. तसेच या कंपनीची चौकशी करा, अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली होती.

मात्र, पोलिसांनी कोणतीही भूमिका न घेतल्यामुळेच पुढील ग्राहकांची फसवणूक झाली. केवळ पोलिसांनी क्लीन चिट दिल्याने हा आर्थिक कट करणे साध्य झाले. त्यामुळे याप्रकरणी सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी न्यायालयात करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी भोसले म्हणाले, या ठिकाणी चुकीची पद्धत वापरून तसेच आमिष दाखवून कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ग्राहकांची व दिव्यांगांची फसवणूक केली आहे. झालेला प्रकार योग्य नाही. याबाबत आम्ही नक्कीच दाद मागणार आहोत, काही झाले तरी ग्राहकांची फसवणूक होणार नाही, यासाठी आमचा पाठपुरावा सुरू राहणार आहे.

तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार

यावेळी दळवी म्हणाले, प्रथमच हा प्रकार लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादीने पोलिसांकरवी त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना विरोध केला होता. मात्र, काहींनी त्या ठिकाणी आम्हाला कर्ज मिळते, त्यामुुळे विरोध करू नका, अशी भूमिका मांडली. त्यामुळे काही अंशी आम्ही गप्प राहिलो, अन्यथा हा प्रकार झालाच नसता. तरीही आता गप्प बसणार नाही. संबधित ग्राहकांचे पैसे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले.

Web Title: Police responsible for fraud of financial company, fraud by naming big leaders in power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.