गुहागरमध्ये राजकीय चढाओढ
By admin | Published: April 10, 2015 10:26 PM2015-04-10T22:26:00+5:302015-04-10T23:47:19+5:30
२६पैकी २ बिनविरोध : अनेक ग्रामपंचायतीत तिरंगी लढत
गुहागर : तालुक्यात होऊ घातलेल्या सार्वत्रिक २६पैकी २ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे २४ ग्रामपंचायतींमध्ये येत्या २२ एप्रिलला निवडणूक होणार आहे. २६ सार्वत्रिक आणि ७ ठिकाणी पोटनिवडणुका होत असून, एकूण ४०८ उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी आज झालेल्या छाननीत ६ उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. आता एकूण ४०२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.तालुक्यातील जाहीर झालेल्या २६ ग्रामपंचायतींपैकी रानवी व काजुर्ली या ग्रामपंचायतींच्या ७ जागांसाठी ७ अर्ज दाखल झाले असून, एकही अर्ज अवैध न ठरल्याने या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. पोटनिवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतींपैकीपाली, मढाळ आणि वेलदूर येथील प्रत्येकी एका जागेसाठी एक अर्ज आल्याने या जागा बिनविरोध झाल्या आहेत.
यामधील आंबेरे खुर्द ३ जागा, पाचेरी आगर येथे १ जागा आणि वरवेली येथील एका जागेसाठी एक ही अर्ज न आल्याने या जागा रिक्त राहणार आहेत. सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या २४ ग्रामपंचायतींपैकी अडूर ग्रामपंचायतीच्या ११ जागांकरिता २२ अर्ज, काताळे ९ जागांकरिता १५ अर्ज, उमराठ ७ जागांकरिता १३ अर्ज, कुडली ९ जागांकरिता १८ अर्ज, शिवणे ७ जागांकरिता ६ अर्ज, , कोंडकारुळ ११ जागांकरिता २८ अर्ज, जामसूत ७ जागांकरिता १६ अर्ज, शीर ७ जागांकरिता १२ अर्ज, गोळेवाडी ७ जागांकरिता ११ अर्ज, पेवे ९ जागांकरिता १७ अर्ज, कोसबीवाडी ७ जागांकरिता ५ अर्ज, मुंढर ७ जागांकरिता १७ अर्ज, तळवली ९ जागांकरिता १७ अर्ज, निगुंडळ ७ जागांकरिता १६ अर्ज, साखरीबुद्रुक ७ जागांकरिता १७ अर्ज, मासू ७ जागांकरिता १७ अर्ज, पालपेणे ९ जागांकरिता १५ अर्ज, भातगाव ७ जागांकरिता ६ अर्ज, खामशेत ७ जागांकरिता १० अर्ज, पिंपर ७ जागांकरिता २३ अर्ज, वेळणेवर ११ जागांकरिता ३० अर्ज, नरवण ९ जागांकरिता १९ अर्ज, मळण ९ जागांकरिता १७ अर्ज, पडवे ११ जागांकरिता २० अर्ज दाखल झाले आहेत.
गुहागरमध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक असल्याने अर्ज मागे घेण्याची शक्यता फार कमी आहे. गुहागर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी व्यूहरचना तयार करण्यात आली असून, या तालुक्यात ठिकठिकाणी पक्षीय प्रभावात निवडणुका होणार असल्याचे पाहायला मिळत आहे. जिह्यातील गुहागरकडे यानिमित्ताने विशेष लक्ष लागून राहिले आहे. (वार्ताहर)
गुहागर तालुक्यात विविध ग्रामपंचायतींवर आता सत्तेचा कल स्पष्ट होणार
बिनविरोध ग्रामपंचायतीचा पायंडा काही ठिकाणी यशस्वी
गुहागरमध्ये तीन पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकात उतरल्यामुळे चूरस वाढली