खेडमध्ये रंगली राजकीय फटकेबाजी

By Admin | Published: December 6, 2015 11:11 PM2015-12-06T23:11:48+5:302015-12-07T00:15:50+5:30

सर्वपक्षीय नेते : ‘इनडोअर गेम’ क्रीडा संकुलाचे लोकार्पण

Political fluttering in the village | खेडमध्ये रंगली राजकीय फटकेबाजी

खेडमध्ये रंगली राजकीय फटकेबाजी

googlenewsNext

खेड : खेड शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या क्रीडा संकुलाच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमात सर्वपक्षीय नेत्यांनी केलेली जोरदार फटकेबाजी अनुभवायला मिळाली. या क्रीडा संकुलासाठी आमदार रामदास कदम यांनी प्रयत्न केल्याचे शिवसेनेच्या गटनेत्यांनी सांगितले. तर मनसेच्या नगराध्यक्षांनी यासाठी ठराव केल्याचे सांगितले. या सर्वांचा समाचार घेत आमदार संजय कदम यांनी नुसता ठराव करून चालत नाही असे सांगत दोघांचीही दांडी गुल केली.
खेड शहर आणि तालुका हा तसा मागासलेला आहे़ मात्र, गेल्या काही वर्षात येथे चांगले खेळाडू तयार होत आहेत़ विविध खेळांसाठी आवश्यक सुविधा नसल्याने परिपूर्ण खेळाडू तयार होत नाहीत. आता तालुक्यात नवीन क्रीडा संकुल उभे राहिले असून, ‘इनडोअर गेम’साठी उभारण्यात आलेल्या क्रीडा संकुलाचे आज लोकार्पणही झाले आहे. ही बाब खेडवासियांसाठी भूषणावह असून, यातूनच नवे राष्ट्रीय खेळाडू तयार होऊ शकतील, असा विश्वास आमदार संजय कदम यांनी यावेळी व्यक्त केला.
शहरातील महाडनाका येथील गोळीबार मैदानानजीक हे क्रीडा संकुल उभे राहिले आहे़ आमदार संजय कदम यांचे हस्ते क्रीडा संकुलाचा लोकार्पण सोहळा शनिवारी पार पडला़ यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, खेडच्या नगराध्यक्षा उर्मिला शेट्ये- पाटणे, सभापती चंद्रकांत कदम, सेनेचे गटनेते संजय मोदी, उपविभागीय अधिकारी जयकृष्ण फड, तहसीलदार अमोल कदम, गटशिक्षणाधिकारी विजय बाईत, मुख्याधिकारी महादेव रोडगे आणि उपअभियंता धनंजय जाधव उपस्थित होते़
शिवसेनेचे गटनेते संजय मोदी यांनी हे क्रीडा संकुल उभे रहावे यासाठी आमदार रामदास कदम यांनी प्रयत्न केले होते़ त्यांच्या प्रयत्नांनीच ते मंजूर झाले आहे, असे सांगितले़ मनसेच्या नगराध्यक्षा उर्मिला शेट्ये - पाटणे यांनी नगर परिषदेने या संकुलाचा ठराव केल्याचे व तो आता प्रत्यक्षात उतरला असल्याचे सांगितले़ या दोन्ही वक्तव्यांचा समाचार घेत आमदार संजय कदम यांनी नुसता ठराव करून चालत नाही तर तो अंमलातही आणावा लागतो व प्रत्यक्ष कृतीही करावी लागते, असे सांगितले़ यावेळी विरोधक आणि आमदार कदम यांच्यातील शाब्दीक जुगलबंदीचा अनुभव रसिकांनी घेतला. (प्रतिनिधी)

Web Title: Political fluttering in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.