सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८२ जागांसाठी पोटनिवडणुका, ५३ ग्रामपंचायती : २३ जूनला मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 15:44 IST2019-05-27T15:41:32+5:302019-05-27T15:44:19+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील बांदिवडे खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासह एकूण ५३ ग्रामपंचायतींच्या ८२ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून २३ जूनला मतदान होणार आहे तर २४ जूनला मतमोजणी होणार आहे. या पोटनिवडणुकांसाठी प्रशासन सज्ज झाले असून मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पोटनिवडणूक लागलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रात २२ मे पासून आचारसंहिता लागू झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८२ जागांसाठी पोटनिवडणुका, ५३ ग्रामपंचायती : २३ जूनला मतदान
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील बांदिवडे खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासह एकूण ५३ ग्रामपंचायतींच्या ८२ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून २३ जूनला मतदान होणार आहे तर २४ जूनला मतमोजणी होणार आहे. या पोटनिवडणुकांसाठी प्रशासन सज्ज झाले असून मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पोटनिवडणूक लागलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रात २२ मे पासून आचारसंहिता लागू झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४२९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यावर काही ग्रामपंचायतींमधील सरपंच अथवा सदस्य यांनी आपले जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने किंवा गैरकारभार केल्यामुळे त्या जागा रिक्त झाल्या आहेत. अशा रिक्त झालेल्या ५३ ग्रामपंचायतींच्या एक सरपंच आणि ८२ सदस्य पदांसाठी शासनाने पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
२३ जून रोजी मतदान होणार असून २४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. या पोटनिवडणुका घेण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. यात मालवण तालुक्यातील ७ ग्रामपंचायतींच्या ९ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. यात बांदिवडे खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी पोटनिवडणूक होणार आहे.
सावंतवाडी तालुक्यातील एक ग्रामपंचायत १ रिक्त जागा, वैभववाडी तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींच्या ३ रिक्त जागा, कणकवली तालुक्यातील १ ग्रामपंचायत १ रिक्त जागा, दोडामार्ग तालुक्यातील ५ ग्रामपंचायती ७ रिक्त जागा, कुडाळ तालुक्यातील २० ग्रामपंचायती २६ रिक्त जागा, देवगड तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींमधील ३५ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे
निवडणूक कार्यक्रम जाहीर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५३ ग्रामपंचायतींच्या ८२ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात नामनिर्देशन पत्र सादर करणे - ३१ मे ते ६ जून २०१९, नामनिर्देशन पत्राची छाननी- ७ जून २०१९, नामनिर्देशन पत्र मागे घेणे - १० जून २०१९ दुपारी ३ वाजेपर्यंत, अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे व चिन्ह वाटप-१० जून २०१९ रोजी दुपारी ३ नंतर, मतदान - २३ जून २०१९ रोजी, मतमोजणी - २४ जून २०१९ रोजी असा निवडणूक कार्यक्रम आहे.