सिंधुदुर्ग : झरेबांबर येथे पुलाला भगदाड, पूल कोसळण्याची भीती : बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 04:35 PM2018-07-11T16:35:31+5:302018-07-11T16:38:26+5:30
पिकुळे-दोडामार्ग रस्त्यावरील झरेबांबर-गावठणवाडी येथील पुलाला भगदाड पडल्याचे उघडकीस आले. या पुलाच्या डागडुजीची वारंवार मागणी करूनही बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने हा पूल कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दोडामार्ग : पिकुळे-दोडामार्ग रस्त्यावरील झरेबांबर-गावठणवाडी येथील पुलाला भगदाड पडल्याचे उघडकीस आले.
या पुलाच्या डागडुजीची वारंवार मागणी करूनही बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने हा पूल कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसे झाल्यास या मार्गावरील वाहतूक बंद होणार असून, बांधकाम विभागाने तातडीने पुलाची दुरूस्ती करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा झरेबांबर सरपंच स्नेहा गवस यांनी दिला आहे.
दोडामार्ग-पिकुळे मार्गावर झरेबांबर गावठणवाडीतील ओहोळावर पूल बांधण्यात आला आहे. या पुलाची बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे धोकादायक स्थिती झाली आहे.
या पुलाला भगदाड पडल्याचे दिसून आले. जर तत्काळ पुलाची दुरूस्ती न झाल्यास कोणत्याही क्षणी कोसळून अपघात होऊ शकतो. शिवाय रस्ताही वाहतुकीसाठी बंद होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे पुलाची डागडुजी करण्याची मागणी होत आहे.