शिक्षण हक्क समिती सोबत सकारात्मक चर्चा; आंदोलन मागे, शिक्षण मंत्र्यासोबत बैठक 

By अनंत खं.जाधव | Published: December 11, 2023 03:42 PM2023-12-11T15:42:11+5:302023-12-11T15:43:46+5:30

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक प्रश्न आपण तात्काळ मिटवणार आहे.

Positive discussions with Education Rights Committee; meeting with education minister deepak kesarkar | शिक्षण हक्क समिती सोबत सकारात्मक चर्चा; आंदोलन मागे, शिक्षण मंत्र्यासोबत बैठक 

शिक्षण हक्क समिती सोबत सकारात्मक चर्चा; आंदोलन मागे, शिक्षण मंत्र्यासोबत बैठक 

सावंतवाडी : शिक्षण हक्क कृती समितीने विविध मागण्यासाठी ११ डिसेंबरला पुकारलेल्या बेमुदत शाळा बंद आंदोलनाच्या इशारा नंतर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि सिंधुदुर्ग शिक्षण हक्क समितीच्या जिल्ह्यातील संस्थाचालक संघटना, मुख्याध्यापक संघटना आणि इतर सर्व माध्यमिक संघटना यांच्यासोबत मंत्री केसरकर यांची महत्वपूर्ण बैठक सावंतवाडीत त्याच्याच निवासस्थानी पार पडली.

या बैठकीत सकारात्मक चर्चा होवून यानंतर शिक्षण हक्क समिती, सिंधुदुर्ग जिल्हा संस्थाचालक संघटना, मुख्याध्यापक संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, शिक्षक भारती, अध्यापक संघ, कास्ट्राईब संघटना, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, मराठा शिक्षक संघटना, शिक्षक सेना या सर्व माध्यमिक शिक्षक संघटनानी सहभाग दर्शवला होता.

तात्काळ वेतनेतर अनुदान द्यावे, मुख्याध्यापक आणि शिक्षकांची पदे भरण्यास तात्काळ परवानगी मिळावी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात यावी. अशा विविध मागण्यांसाठी हे बंद आंदोलन करण्यात आले होते. मात्र, दीपक केसरकर यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक प्रश्न आपण तात्काळ मिटवणार आहे. यासाठी या प्रश्नांची यादी करून लवकरच बैठक घेणार असल्याचे सकारात्मक आश्वासन दीपक केसरकर यांनी सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना दिले. यानंतर हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय संघटनांनी घेतला आहे.

Web Title: Positive discussions with Education Rights Committee; meeting with education minister deepak kesarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.