रत्नागिरी समुद्रात दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात
By Admin | Published: April 16, 2015 11:30 PM2015-04-16T23:30:39+5:302015-04-17T00:04:07+5:30
जिल्हाभरात सागरी क्षेत्रात हे अभियान राबविले जात आहे.
रत्नागिरी : देशात पुन्हा घातपाती कारवाया होण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज दिवसभर सुरक्षा यंत्रणेची चाचणी घेण्यात आली. त्यात दुपारी समुद्रात दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हे अभियान उद्यापर्यंत चालणार आहे. महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
जिल्हाभरात सागरी क्षेत्रात हे अभियान राबविले जात आहे. रत्नागिरी शहर पोलीस ठाणे व रत्नागिरी जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी या सागरी कवच अभियानात भाग घेतला. शहर पोलीस ठाण्याचे ५४, तर पोलीस मुख्यालयाचे ३५ असे ८९ पोलीस रत्नागिरी विभागातील या अभियानात कार्यरत होते. उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर, पोलीस निरीक्षक इंद्रजीत काटकर व अन्य अधिकारीही या अभियानात सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)