महिलांनी होणाºया अत्याचाराला निर्भीडपणे वाचा फोडावी - प्राजक्ता शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 06:23 PM2019-04-05T18:23:46+5:302019-04-05T18:25:37+5:30
फणसगांव कला व वाणिज्य महाविद्यालयात कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक अत्याचार या विषयावर महिला विकास कक्षामार्फत मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक अॅड. प्राजक्ता शिंदे
सिंधुदुर्ग : फणसगांव कला व वाणिज्य महाविद्यालयात कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक अत्याचार या विषयावर महिला विकास कक्षामार्फत मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक अॅड. प्राजक्ता शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष नाईक, महिला विकास कक्षाच्या प्रमुख दक्षता कोरगावकर, प्रा. सायली भोगटे, प्रा. सुचिता चव्हाण, अनुराधा नारकर, प्रा. सनिंद्र आचरेकर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अॅड. प्राजक्ता शिंदे यांनी २०१३ च्या कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक अत्याचार या कायद्याची बाजू समजून सांगताना त्याचे फायदे आणि गैरवापर झाल्यास त्याचे होणारे दुष्परिणाम यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच समाजात घडणाºया स्त्रियांवरील अत्याचारांच्या घटनांविषयी अनेक उदाहरणे दिली. तसेच त्यावर कायदेशीर उपाय विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. सद्यस्थितीत सोशल मीडियामुळे होणाºया गुन्ह्यात वाढ झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घेतली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. महिलांनी होणाºया अत्याचाराला निर्भीडपणे वाचा फोडावी, असेही त्यांनी सांगितले. यानंतर
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष नाईक यांनी महिलांनी शारीरिक आणि मानसिक अत्याचाराविरोधात आवाज उठवावा, असे आवाहन केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला विकास कक्षाच्या प्रमुख प्रा. दक्षता कोरगावकर यांनी केले. सूत्रसंचालन अनुराधा नारकर यांनी केले. तर आभार प्रा. स्वप्नील पोळ यांनी मानले.