कणकवली तालुका खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षपदी प्रकाश सावंतांची बिनविरोध निवड 

By सुधीर राणे | Published: January 19, 2023 12:08 PM2023-01-19T12:08:21+5:302023-01-19T12:08:56+5:30

कणकवली तालुका खरेदी विक्री संघासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना युतीची सत्ता

Prakash Sawant elected unopposed as President of Kankavali Taluka Buying and Selling Association | कणकवली तालुका खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षपदी प्रकाश सावंतांची बिनविरोध निवड 

कणकवली तालुका खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षपदी प्रकाश सावंतांची बिनविरोध निवड 

Next

कणकवली : कणकवली तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी प्रकाश सावंत तर उपाध्यक्षपदी सुरेश ढवळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून के. आर. धुळप यांनी काम पाहिले.

कणकवली तालुका खरेदी विक्री संघासाठी ७ जानेवारी रोजी झालेल्या निवडणुकीत भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युती व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत लढत झाली होती. यात सर्वच्या सर्व १५ ही जागा भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना युतीने मिळविल्या होत्या. 
गुरुवारी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली.

अध्यक्ष पदासाठी प्रकाश सावंत व उपाध्यक्ष पदासाठी सुरेश ढवळ त्यांची नावे जाहीर करण्यात आली. त्यानंतर त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केले. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज प्राप्त झाल्याने बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर खरेदी विक्री संघाचे मावळते अध्यक्ष विठ्ठल देसाई, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी अभिनंदन केले.

यावेळी किरण गावकर, अतुल दळवी, श्रीपत पाताडे, रघुनाथ राणे, संजय शिरसाट, प्रशांत सावंत, गुरुप्रसाद वायंगणकर, मिथिल सावंत, सदानंद हळदीवे, स्मिता पावसकर, विनिता बुचडे, गणेश तांबे, लीना परब तसेच संघाचे व्यवस्थापक गणेश तावडे, वरवडे सरपंच करुणा घाडीगावकर, नगरसेविका कविता राणे, राजन परब आदी उपस्थित होते.

Web Title: Prakash Sawant elected unopposed as President of Kankavali Taluka Buying and Selling Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.