रिफायनरी विरोधात गिर्ये-रामेश्वर-विजयदुर्ग येथे महाआरती, चर्च आणि मशीदिमध्ये प्रार्थना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 16:40 IST2019-01-30T16:37:58+5:302019-01-30T16:40:14+5:30
नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पात गिर्ये-रामेश्वर-विजयदुर्ग या भागातील 32 धार्मिक स्थळे येत असून त्या धार्मिक स्थळांना कोणताही धोका पोहोचू नये अथवा ती धार्मिक मंदिरे उद्वस्त होऊ नयेत याकरिता आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र स्वाभिमान पक्षामार्फत आज महाप्रार्थना करण्यात आली. यांत 23 मंदिरात आरती, 2 चर्चमध्ये प्रेयर आणि 7 मशीदिमध्ये दुवा मागण्यात आली.

रिफायनरी विरोधात गिर्ये-रामेश्वर-विजयदुर्ग येथे महाआरती, चर्च आणि मशीदिमध्ये प्रार्थना
कणकवली : नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पात गिर्ये-रामेश्वर-विजयदुर्ग या भागातील 32 धार्मिक स्थळे येत असून त्या धार्मिक स्थळांना कोणताही धोका पोहोचू नये अथवा ती धार्मिक मंदिरे उद्वस्त होऊ नयेत याकरिता आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र स्वाभिमान पक्षामार्फत आज महाप्रार्थना करण्यात आली. यांत 23 मंदिरात आरती, 2 चर्चमध्ये प्रेयर आणि 7 मशीदिमध्ये दुवा मागण्यात आली.
ऐतिहासिक रामेश्वर मंदिरात आमदार नितेश राणे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा प्रणिता पाताडे,नगराध्यक्ष योगेश चांदोसकर, उपनगराध्यक्ष संजय तारकर, जी.प.समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, देवस्थान ट्रस्टचे सुरेश केळकर, उदय पुजारे, सचिन खडपे, जी.प.सदस्य सावी लोके, पं.स.सदस्य रवी पाळेकर, रामेश्वर सरपंच विनोद सुके, नासिर मुकादम, महेश नारकर,अमित साटम ,महिलाध्यक्ष केळुसकर, प्रीती वाडेकर, उत्तम बिर्जे , स्वाभिमान पदाधिकारी आदी उपस्थित होते.
गिर्ये येथे चौंडेश्वरि मंदिरात जिल्हासरचिटणीस बाळ खडपे, संजय बोंबडी, विठठलमंदिर कोलवाडी येथे प्रकाश राणे, गिर्ये मशिदीमध्ये अरिफ बगदादी, मुनाफ ठाकूर, विठ्ठल मंदिर विजयदुर्ग येथे संदीप साटम, विजयदुर्ग मशिदीमध्ये नासिर काझी, गणेश मंदिरात अमोल तेली, विजयदुर्ग चर्चमध्ये जॉऱ्होना फर्नांडिस,दत्ता सामंत आदी पदाधिकारी उपस्थित राहून मंदिरात आरती, चर्चमध्ये प्रेयर आणि मशिदीमध्ये दुवा मागण्यात आली.