संशयितांचे अटकपूर्व जामीन फेटाळले, गोव्यातील कंपनीची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 03:16 PM2020-11-07T15:16:54+5:302020-11-07T15:18:54+5:30

Crime News, sindhudurg, Police, goa, fraud जागा खरेदी करून देतो असे सांगून गोवा येथील मारगॉक्स हॉटेल्स प्रा. या कंपनीची २ कोटी ७७ लाख ३७ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आचरा येथील संजय दत्ताराम कांबळी, त्याची पत्नी पूजा संजय कांबळी, भाऊ विलास दत्ताराम कांबळी, रमेश गणपत आडकर व संतोष गावकर यांच्याविरोधात देवगड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The pre-arrest bail of the suspects was rejected, defrauding the company in Goa | संशयितांचे अटकपूर्व जामीन फेटाळले, गोव्यातील कंपनीची फसवणूक

संशयितांचे अटकपूर्व जामीन फेटाळले, गोव्यातील कंपनीची फसवणूक

Next
ठळक मुद्देसंशयितांचे अटकपूर्व जामीन फेटाळले, गोव्यातील कंपनीची फसवणूकआचरा येथील पाच जणांचा समावेश

सिंधुदुर्गनगरी : जागा खरेदी करून देतो असे सांगून गोवा येथील मारगॉक्स हॉटेल्स प्रा. या कंपनीची २ कोटी ७७ लाख ३७ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आचरा येथील संजय दत्ताराम कांबळी, त्याची पत्नी पूजा संजय कांबळी, भाऊ विलास दत्ताराम कांबळी, रमेश गणपत आडकर व संतोष गावकर यांच्याविरोधात देवगड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या प्रकरणात या सर्वांना अंतरिम अटकपूर्व जामिन मंजूर झाला होता. या अंतरिम जामिनाच्या अंतिम सुनावनीत अतिरिक्त सत्र न्यायाधीश, आर. बी. रोटे अटक पूर्व जामिन अर्ज नामंजूर केले आहेत.

मारगॉक्स प्रा ली. या कंपनीच्या गोवा येथील मुख्य कार्यालयाकडून सिंधुदुर्गातील प्रोजेक्टसाठी जागा खरेदी करण्याच्या इराद्याने सन २००६ ते २०१२ या कालावधीत संजय दत्ताराम कांबळी हे कंपनीच्या संबंधात आले. त्यानंतर त्यांनी आपल्या पाहण्यात समुद्रकिनारी जागा आहेत असे भासवून कंपनीकडून जागा देण्याच्या अटीवर कुलमुखत्यार पत्र तयार करून घेतले.

याच दरम्यान संजय कांबळी यांनी देवगड तालुक्यातील आडबंदर, मुणगे, हिंदळे, मोरवे या भागातील जमिनी आपल्याकडे असल्याचे सांगत त्या जमिनीचा सहहिस्सेदार असल्याचे कंपनीला भासवून कंपनीला कागदपत्रे दाखविली. त्यावर कंपनीने विश्वास ठेवून संजय कांबळी यांनी सांगितल्याप्रमाणे जागा मालकांच्या नावे सुमारे २ कोटी ७७ लाख ३७ हजार इतक्या रकमेचे डिमांड ड्राफ्ट स्वरूपातील रक्कम जमा केली. ही रक्कम कांबळी याने वेळोवेळी उचल करून घेतली. मात्र जागा कंपनीच्या नावे करण्याबाबत टाळाटाळ सुरू केली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता संदेश तायशेट्ये, सहाय्यक सरकारी अभियोक्ता रूपेश देसाई व तक्रारदार मारगॉक्स हॉटेलस् प्रा. लि. तर्फे वकील अजित भणगे व अँड. मिहीर भणगे यांनी काम पाहिले.

पाच जणांविरोधात गुन्हे दाखल

कंपनीच्यावतीने त्यानंतर वेळोवेळी ही जागा कंपनीच्या नावे करण्याबाबत संधी देण्यात आली. मात्र कांबळी यांनी सदरच्या जागा या आपल्या नावावर केल्या. तर त्यातील काही जागा पत्नी पूजा संजय कांबळी, भाऊ विलास दत्ताराम कांबळी, मेहुना रमेश गणपत हडकर व नातेवाईक संतोष गावकर यांच्या नावे केली. त्यानंतर कंपनीने तक्रार दिली त्यानुसार गुन्हा दाखल झाला होता.

Web Title: The pre-arrest bail of the suspects was rejected, defrauding the company in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.