तीन फुटाची वाळूची भिंत तयार
By admin | Published: April 21, 2016 11:47 PM2016-04-21T23:47:12+5:302016-04-22T00:49:54+5:30
आचरा किनारपट्टी : मच्छिमारांमध्ये चिंता, उधाणामुळे घडला प्रकार
तीन फुटाची वाळूची भिंत तयार
आचरा किनारपट्टी : मच्छिमारांमध्ये चिंता, उधाणामुळे घडला प्रकार
आचरा : समुद्राला आलेल्या उधाणाची तीव्रता जास्त असल्याने आचरा किनाऱ्यावर १०० मीटर लांब व ३ फूट उंचीची वाळूची भिंत तयार झाली आहे. साधारणपणे पावसाळ्यात अशाप्रकारची स्थिती होते. परंतु अचानकपणे आलेल्या उधाणामुळे अशाप्रकारची भिंत उभी राहिल्याने चर्चेचा विषय बनत मच्छिमारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
एकीकडे वेंगुर्ला, निवती बंदरात होत असलेले समुद्रातील स्फोट आचरा येथे सागर किनारी उधाणामुळे समुद्रकिनाऱ्यावर वाळूची भिंत निर्माण झाली आहे.यामुळे मच्छिमारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. यामुळे मच्छिमारही संवेदनशील बनले आहेत. पावसाळ्यात ज्याप्रमाणे समुद्रात उधाण येवून लाटांचा आघात होतो तशाप्रकारचे उधाण येवून लाटांचा आघात होत असल्याची माहिती स्थानिक मच्छिमार देत आहेत. त्यामुळे याबाबत प्रशासनाने काळजी घेण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)