अखेर प्रतिक्षा संपली! सिंधुदुर्गात मान्सून पूर्व सरीची हजेरी, पहाटे पासून पावसाचा शिडकावा 

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: June 10, 2023 11:48 AM2023-06-10T11:48:18+5:302023-06-10T11:48:33+5:30

मागील काही वर्षांपासून जूनमध्ये लांबलेला पावसाची चाहूल

Presence of pre monsoon showers in Sindhudurga, sprinkle of rain from early morning | अखेर प्रतिक्षा संपली! सिंधुदुर्गात मान्सून पूर्व सरीची हजेरी, पहाटे पासून पावसाचा शिडकावा 

अखेर प्रतिक्षा संपली! सिंधुदुर्गात मान्सून पूर्व सरीची हजेरी, पहाटे पासून पावसाचा शिडकावा 

googlenewsNext

सिंधुदुर्ग : हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार केरळ पाठोपाठ मान्सून पूर्व पावसाने महाराष्ट्राच्या टोकावर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज, शनिवारी (दि.१०) पहाटे पासून हजेरी लावली. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. 

शनिवारी पहाटे पाचनंतर जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेमुळे वातावरण निर्मिती झाली. प्रत्यक्षात मान्सून दाखल व्हायला अजून दोन तीन दिवस जातील. मात्र मागील काही वर्षांपासून जूनमध्ये लांबलेला पावसाची चाहूल आता लागली आहे. 

मे महिन्यात यावर्षी जरासुद्धा पाऊस झाला नाही. कडक उन्हाळ्याने पाणी पातळी घटली आहे. त्यामुळे अनेक भागात कृत्रिम पाणीटंचाई जाणवत होती. नदी, नाले, ओहोळ पूर्ण सुकून गेले आहेत. त्यामुळे एकीकडे गर्मी आणि पाण्याची टंचाई यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

बळीराजाने तर पावसाच्या भरवशावर भात पेरणी केली आहे. त्यामुळे पाऊस कधी बरसणार ? म्हणून बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.

Web Title: Presence of pre monsoon showers in Sindhudurga, sprinkle of rain from early morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.