सिंधुदुर्गात अवकाळी पावसाची हजेरी,बागायतदार चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 02:05 PM2021-01-08T14:05:50+5:302021-01-08T14:07:00+5:30
Rain Kankavli Sindhudurg- कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी रात्री अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे बागायतदारामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे .
कणकवली : कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी रात्री अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे बागायतदारामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे .
गुरुवारी सकाळपासूनच सर्वत्र ढगाळ वातावरण होते. सध्या पहाटेला थंडी तर दुपारी उष्णतेचे प्रमाण वाढत आहे . मात्र, गुरुवारी रात्री अचानक काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह विजांचा लखलखाट करत मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे लोकांना एकाच दिवसात तीन ऋतू अनुभवायला मिळाले . या बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे .
वेंगुर्ला, सावंतवाडी आदी भागातही पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी पहाटेही अनेक ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या.त्यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला असला तरी दुपारी १२ वाजल्यानंतर पुन्हा वातावरणात उष्णतेचे प्रमाण वाढले होते.