सावंतवाडीत जुगार अड्ड्यावर छापा

By admin | Published: December 23, 2016 11:02 PM2016-12-23T23:02:28+5:302016-12-23T23:02:28+5:30

अकराजण ताब्यात : शहरातील बड्या व्यक्तींचा समावेश; २१ हजारांच्या रोकडसह चार दुचाकी जप्त

Print to gambling in Sawantwadi | सावंतवाडीत जुगार अड्ड्यावर छापा

सावंतवाडीत जुगार अड्ड्यावर छापा

Next

सावंतवाडी : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका हॉटेलची खोली भाड्याने घेऊन तेथे सुरू असलेल्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर पोलिस उपअधीक्षक दयानंद गवस यांच्यासह सावंतवाडी पोलिसांनी छापा टाकून अकराजणांना ताब्यात घेतले. यामध्ये शहरातील बड्या व्यक्तींचा समावेश आहे. पोलिसांनी २१ हजार ४५७ रुपयांच्या रोकडसह ५५ हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. ही कारवाई शुक्रवारी दुपारी करण्यात आली.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एका हॉटेलमध्ये रूम भाड्याने घेऊन तीनपत्ती जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी दुपारी १च्या सुमारास हॉटेलच्या सभोवताली नाकाबंदी केली. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक दयानंद गवस यांच्यासह पोलिस निरीक्षक शंकर पाटील, उपनिरीक्षक जयदीप कळेकर, सचिन गिरीगोसावी, कॉन्स्टेबल
अमोद सरंगले व विकी गवस यांनी हॉटेलच्या आतमध्ये प्रवेश केला. यावेळी हॉटेलच्या रूम नं. १०१ मध्ये तीन पत्ती जुगार सुरू होता.
या जुगार अड्ड्यावर छापा टाकून ताब्यात घेतलेल्यांमध्ये भानुदास नारायण सावंत (वय ६४ रा. परबवाडी, कुणकेरी-सावंतवाडी), पुंडलिक यशवंत सावंत (६३ रा. खालचीवाडी-ओवळिये), अरुण नागेश म्हापसेकर (५४ रा. वैश्यवाडा-सावंतवाडी) राजेंद्र रामचंद्र डेगवेकर (४२, रा. सुतारवाडी-माडखोल), दिवाकर श्रीपाद सुकी (६२, रा. वैश्यवाडा-सावंतवाडी), सुरेश जयराम डिचोलकर (५१, रा. कासारवाडा-कोलगाव), दत्ताराम गणपत परब (३७, रा. बाहेरचावाडा-सावंतवाडी), भोजू शिवा भोई (४४, रा. ढोलकरवाडी-माणगाव), गुरुनाथ वासुदेव सावंत (६१, रा. खालचीवाडी-देवसू), प्रताप जगन्नाथ चिपळुणकर (६२, रा. भटवाडी-ओटवणे), धीरज प्रकाश सुकी (३७, रा. वैश्यवाडा-सावंतवाडी) यांचा समावेश आहे.
हा तीन पत्ती जुगार सकाळपासूनच सुरू असल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. संशयितांवर कारवाईची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक जयदीप कळेकर करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Print to gambling in Sawantwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.