प्रियदर्शनी जागुष्टेचा षटकार

By admin | Published: November 20, 2015 11:17 PM2015-11-20T23:17:46+5:302015-11-21T00:19:56+5:30

पॉवरलिफ्टिंग स्पर्धा : ज्युनिअर स्ट्राँग वुमन आॅफ महाराष्ट्र

Priyadarshini jagushache six | प्रियदर्शनी जागुष्टेचा षटकार

प्रियदर्शनी जागुष्टेचा षटकार

Next

रत्नागिरी : महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशन, नागपूर यांचे मान्यतेने व वाशिम जिल्हा पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या सहकार्याने वाशिम येथे राज्यस्तरीय सब ज्युनिअर मुले, मुली व मास्टर पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत प्रियदर्शनी जागुष्टे हिने सलग सहावेळा ज्युनिअर स्ट्राँग वुमन आॅफ महाराष्ट्रचा किताब पटकावला.
रत्नागिरी जिल्हा पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्यावतीने झोरेज स्पोर्टस् अ‍ॅकॅडमीच्या खेळाडूंनी जिल्ह््याचे प्रतिनिधीत्व करत १० पदके पटकावली. मुलांच्या स्पर्धेत - ५६ किलो वजनी गटात - संजय वसंत नरिम (कांस्य), ६० किलो वजनी गटात - रोहीत विलास कांबळे (सुवर्ण), ७५ किलो वजनी गटात - आकाश धाडवे (कांस्य), १०० किलो वजनी गटात - प्रथमेश पावसकर (रौप्य) तर ७५ किलो वजनी गटात संदीप गुरव चौथ्या स्थानावर राहिला.
मुलींच्या स्पर्धेत ४८ किलो वजनी गटात - सिमरन आवटी (रौप्य), ज्युनिअर ४८ किलो वजनी गटात - धनश्री गोवर्धन शेलार (सुवर्ण), ५६ किलो वजनी गटात - गंधाली रामचंद्र चौगुले (रौप्य), ६७.५ किलो वजनी गटात - अनुजा दिलीप सावंत (सुवर्ण), ७५ किलो वजनी गटात - प्रतीक्षा प्रदीप साळवी (रौप्य) तर ८२ किलो वजनी गटात - प्रियदर्शनी जागुष्टे हिने सुवर्ण पदक व ज्युनिअर स्ट्राँग वुमन आॅफ महाराष्ट्र हा किताब पटकावला.
आपल्या संपूर्ण पॉवरलिफ्टिंग करियरमध्ये रत्नागिरीच्या प्रियदर्शनी जागुष्टे हिने सहावेळा ज्युनिअर स्ट्राँग वुमन आॅफ महाराष्ट्राचा किताब पटकावला आहे. त्यामुळे आता या किताबावर तिच्याच नावाची मोहर उमटली जात आहे.
स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंची दि. १६ ते १९ डिसेंबर २०१५दरम्यान इंदोर (मध्यप्रदेश) येथे होणाऱ्या राष्ट्रीय सब ज्युनिअर व ज्युनिअर पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. (प्रतिनिधी)


वाशिम येथे पार पडली राज्यस्तरीय स्पर्धा.
रत्नागिरी जिल्ह्याच्या खेळांडूंनी पटकावली १० पदके.
डिसेंबर महिन्यात राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा.
रत्नागिरीच्या खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघात निवड़

Web Title: Priyadarshini jagushache six

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.