शोधमोहिमेत अडचणी --जिल्हाधिकारी
By admin | Published: August 5, 2016 11:10 PM2016-08-05T23:10:02+5:302016-08-06T00:25:10+5:30
आंजर्ले समुद्रकिनारी, म्हाप्रळखाडी आणि आंबेत येथे एकूण चार मृतदेह होते
रत्नागिरी : स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने म्हाप्रळ आणि आंबेतमध्ये शोधमोहीम राबवण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली होती. मात्र प्रचंड पाऊस आणि खाडीचे वाढलेले पाणी यामुळे या मोहिमेला खूप अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सद्यस्थितीत एनडीआरएफच्या दोन बोटींच्या सहाय्याने बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी ‘लोकमत’ला दिली. आज दिवसभरात आंबेत येथे तीन आणि म्हाप्रळ येथे एक असे एकूण चार मृतदेह सापडले आहेत. स्थानिक ग्रामस्थ तसेच मच्छिमारांच्या सहायाने जिल्हा प्रशासनाने काल रात्रीपासूनच बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. मात्र, जोरदार पाऊस, वाऱ्याचा वेग आणि खाड्यांची वाढलेली पातळी यामुळे शोध कार्यात मोठ्या प्रमाणावर अडथळे येत होते. ही परिस्थिती पाहून स्थानिक मच्छिमारांनीही आपल्या बोटी समुद्रात घालण्यास नकार दिला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफकडे विनंती केल्याने त्यांनी दोन बोटी उपलब्ध करून दिल्या आहेत. सध्या या बोटींच्या सहायाने शोधमोहीम सुरू असल्याचे जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी सांगित मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर - महाड दरम्यानचा पूल तुटून झालेल्या अपघातात जिल्ह्यातील ४० जण बेपत्ता झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली असून त्यापैकी आज तीन मृतदेह आंबेत येथे तर एक मृतदेह म्हाप्रळ येथे सापडला. काल आंजर्ले समुद्रकिनारी, म्हाप्रळखाडी आणि आंबेत येथे एकूण चार मृतदेह होते. बेपत्ता लोकांपैकी आठजणांचे मृतदेह आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात सापडले आहेत. सद्यस्थितीत शोधमोहीम राबवण्याऐवजी मृतदेह वाहून जाताना दिसत आहे का, याकडे लक्ष ठेवण्यावर भर देण्यात येत आहमुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर - महाड दरम्यानचा पूल तुटल्याने यावरून अनेक वाहने वाहून गेली. त्यात रत्नागिरीतील जयगड - मुंबई आणि राजापूर - बोरीवली या दोन बस आणि एक खासगी तवेरा गाडीचा समावेश होता. यातून प्रवास करणारे एकूण ४० प्रवासी बेपत्ता असल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे.
जिल्हा नियंत्रण कक्षाकडे करण्यात आलेल्या नोंदीनुसार जयगड-मुंबई या बसमधील प्रवासी चालक - वाहकासह एकूण १२ जण होते. त्यापैकी श्रीकांत शामराव कांबळे (५८, सावर्डा पोलीस लाईन, चिपळूण) यांचा आंजर्ले येथे तर सुनील महादेव बैकर (३५, सत्कोंडी-रत्नागिरी) यांचा आंबेत येथे मृतदेह सापडला. राजापूर-बोरिवली या बसमधील एकूण १९ प्रवाशांपैकी जयेश गोपाळ बाणे (३६, बाणेवाडी-सोलगाव, राजापूर) यांचा मृतदेह काल म्हाप्रळ येथे सापडला होता.
आज जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात चारजणांचे मृतदेह सापडले. त्यात मंडणगड तालुक्याच्या नजीक असणाऱ्या आंबेत येथे जयगड मुंबई बसमध्ये असलेल्या अनिश संतोष बलेकर (१२, सत्कोंडी-रत्नागिरी) याचा तर राजापूर बोरिवली बसमध्ये असलेले भिकाजी वाघधरे (७४, जोगेश्वरी, मुंबई) आणि संतोष गवताडे (३६, नालासोपारा) अशा तिघांचे मृतदेह सापडले. तसेच राजापूर बोरिवली बसमध्ये असलेल्या आसिफ मेमन चौगुले (काविळतळी, चिपळूण) यांचा मृतदेह म्हाप्रळ येथे सापडला. (प्रतिनिधी)
मृतदेह वाहून गेले?
आज शुक्रवारी मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ आंबेत पुलाच्या परिसरात पुलाखालून वाहून जाणारी सहा ते आठ मृतदेह दोन्ही गावातील ग्रामस्थांना दिसले. मात्र पाण्याचा प्रवाह तीव्र असल्याने आणि यंत्रसामुग्री नसल्याने सर्व मृतदेह लिपनी वावे या रायगड जिल्ह्यातील गावांच्या हद्दीत वाहून गेली़