शिवराज्याभिषेक दिन: कणकवली शहरात मिरवणूक; शिवाजी महाराजांचा जयघोष, विविध नृत्य प्रकारांचे सादरीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 11:49 AM2022-06-07T11:49:11+5:302022-06-07T11:49:44+5:30

वाहतुकीला कोणाताही अडथळा न होता शिस्तबद्ध पद्धतीने हि मिरवणूक झाली.

Procession in Kankavali city on the occasion of ShivRajyabhishek Day | शिवराज्याभिषेक दिन: कणकवली शहरात मिरवणूक; शिवाजी महाराजांचा जयघोष, विविध नृत्य प्रकारांचे सादरीकरण

शिवराज्याभिषेक दिन: कणकवली शहरात मिरवणूक; शिवाजी महाराजांचा जयघोष, विविध नृत्य प्रकारांचे सादरीकरण

googlenewsNext

कणकवली : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्यावतीने कणकवली शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत सोमवारी मिरवणूक काढण्यात आली.

कणकवली विजयभवन येथे या मिरवणुकीचा श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. तसेच छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. 'छत्रपती शिवाजी महाराज कि जय', 'जय शिवाजी जय भवानी' चा जयघोष करीत डीजे, लेजीम वाद्याच्या सहाय्याने मोठ्या उत्साहात ही मिरवणूक काढण्यात आली. वाहतुकीला कोणाताही अडथळा न होता शिस्तबद्ध पद्धतीने हि मिरवणूक झाली.

कणकवली येथील विजयभवनकडून हि मिरवणूक श्रीधर नाईक चौक येथे आल्यानंतर श्रीधर नाईक यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तेथून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.तेथून अप्पासाहेब पटवर्धन चौक ते बाजारपेठ मार्गे पटकीदेवी ते छत्रपती शिवाजीनगर ते विजयभवन अशी डीजेच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत शिवाजी महाराजांचा देखावा साकारण्यात आला होता. यावेळी प्रत्येक चौकात विविध नृत्य प्रकार सादर करण्यात आले. त्याचबरोबर लेझीम नृत्य सादरीकरण करण्यात आले.

यावेळी विजयराव नाईक फार्मसी कॉलेजचे संचालक सतीश नाईक,उद्योजक संकेत नाईक, युवक कल्याण संघाचे खजिनदार प्रा. मंदार सावंत, प्रा. मेघा बाणे, प्रा. आदिती सावंत, प्राचार्य डॉ. गणुरे, उपप्राचार्या पूजा पटेल, प्रा.अमर कुलकर्णी, रोहन डोंगरे आदींसह महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Procession in Kankavali city on the occasion of ShivRajyabhishek Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.