मारेकऱ्यांच्या हिटलिस्टवर सावंतवाडीतील प्राध्यापक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 12:05 AM2018-08-29T00:05:04+5:302018-08-29T00:05:09+5:30

Professor of Sawantwadi on the killers' hitlist | मारेकऱ्यांच्या हिटलिस्टवर सावंतवाडीतील प्राध्यापक

मारेकऱ्यांच्या हिटलिस्टवर सावंतवाडीतील प्राध्यापक

Next

सावंतवाडी : महाराष्ट्रासह कर्नाटकमध्ये विचारवंतांच्या झालेल्या हत्यांप्रकरणी संशयित आरोपींना महाराष्ट्र एटीएसने अटक केली आहे. त्यांच्या जबाबातून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यात देशातील काही साहित्यिक तसेच लेखक असे मिळून २७ जण त्यांच्या हिटलिस्टवर होते. त्यात सावंतवाडीतील एका प्राध्यापकाचाही समावेश होता, असा दावा एका इंग्रजी दैनिकाच्या हवाल्याने सावंतवाडी नगरपालिकेचे नगरसेवक डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे. त्यांनी या प्रवृत्तीचा निषेध करणारा ठराव मंगळवारच्या सावंतवाडी पालिका बैठकीत मांडला. तो एकमताने मंजूर करण्यात आला.
सावंतवाडी नगरपालिकेची सभा नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, गटनेते राजू बेग, ज्येष्ठ नगरसेविका अनारोजिन लोबो, आनंद नेवगी, सुरेंद्र्र बांदेकर, शुभांगी सुकी, भारती मोरे, दीपाली सावंत, दीपाली भालेकर, मनोज नाईक, समृद्धी विर्नोडकर, सुधीर आडिवरेकर, डॉ. जयेंद्र्र परुळेकर, आदी उपस्थित होते.
संशयित मारेकºयांच्या हिटलिस्टवर देशातील काही साहित्यिक तसेच लेखकांची नावे होती. यात सावंतवाडीतील एका प्राध्यापकाचाही समावेश होता, पण अशा प्रवृत्तीचा निषेध करण्यात यावा, अशी मागणी डॉ. परुळेकर यांनी केली. तशा ठरावाला एकमताने मंजुरी देण्यात आली. मारेकºयांच्या हिटलिस्टवर असलेले हे साहित्यिक आणि त्यांच्या संस्थेचे नाव काय हे सांगण्यास परुळेकर यांनी नकार दिला.

Web Title: Professor of Sawantwadi on the killers' hitlist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.