सिंधुदुर्ग : अंध अंपग संघटनेच्यावतीने सावंतवाडीत निषेध मोर्चा काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 05:20 PM2019-01-05T17:20:27+5:302019-01-05T17:25:04+5:30

पालकमंत्री दिपक केसरकर यांनी दिलेले आश्वासन न पाळता आपली फसवणूक केल्याप्रकरणी महालक्ष्मी अंध-अंपग सामाजिक संघटनेच्यावतीने १० जानेवारी रोजी त्यांच्या कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. 

Prohibition Morcha in Sawantwadi by Blind Association | सिंधुदुर्ग : अंध अंपग संघटनेच्यावतीने सावंतवाडीत निषेध मोर्चा काढणार

सिंधुदुर्ग : अंध अंपग संघटनेच्यावतीने सावंतवाडीत निषेध मोर्चा काढणार

Next
ठळक मुद्देअंध अंपग संघटनेच्यावतीने सावंतवाडीत निषेध मोर्चापालकमंत्र्यानी आश्वासन पाळले नाही

सावंतवाडी : पालकमंत्री दिपक केसरकर यांनी दिलेले आश्वासन न पाळता आपली फसवणूक केल्याप्रकरणी महालक्ष्मी अंध-अंपग सामाजिक संघटनेच्यावतीने १० जानेवारी रोजी त्यांच्या कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. 

येथील पालिकेने कारवाई करुन भटवाडी येथील निलेश नार्वेकर यांचा काढून टाकलेला स्टॉल पुन्हा उभारण्यास द्यावा, या मागणीसाठी अंध-अपंग सामाजिक संघटनेच्यावतीने नार्वेकर यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानासमोर अपंग दिनी उपोषण छेडले होते.

या उपोषणकर्त्यांची पालकमंत्री केसरकर यांनी भेट घेत नार्वेकर यांना शहरात स्टॉल उभारणीसाठी आपण पालिकेमार्फत सहकार्य करण्याची ग्वाही देत उपोषण मागे घेण्यास सांगितले होते. पालकमंत्री यांनी दिलेल्या शब्दावर विश्वास ठेवत अंध बांधवांनी आपले उपोषण मागे घेतले होते.

मात्र त्यानंतर अद्यापपर्यंत पालकमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची पालिकेकडून कोणतीच दखल घेण्यात नाही. नार्वेकर यांनी यासंदर्भात मुख्याधिकारी जावडेकर यांची भेट घेत चर्चा केली असता शहरातील काही पाच जागा सुचवण्याचे जावडेकर यांनी नार्वेकर यांना सांगितले होते. त्यानुसार नार्वेकर यांनी लेखी पत्राने शहरातील पाच जागा सुचवल्या होत्या. मात्र या जागेवर स्टॉल उभारण्याबाबत कुठल्याही प्रकारचे पत्र किंवा लेखी सूचना आपल्याला मिळाली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याचे नार्वेकर यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, पालकमंत्री केसरकर यांनी आश्वासन देऊनही नार्वेकर यांची केलेली फसवणूक लक्षात घेता महालक्ष्मी अंध-अपंग सामाजिक संघटना या अन्यायाविरोधात १० जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या निवासस्थानावर निषेध मोर्चा काढणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष हरी गावकर, उपाध्यक्ष विठ्ठल शिरोडकर यांनी म्हटले आहे.

अंध-अपंगांचा पाच टक्के राखीव निधी अनुदान स्वरूपात १०० टक्के मिळावा यासाठी जिल्हाधिकारी, समाज कल्याण अधिकारी यांना आदेश द्यावेत आदी विविध मागण्या या मोर्चाव्दारे ते मांडणार असल्याचे म्हटले आहे.

Web Title: Prohibition Morcha in Sawantwadi by Blind Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.