सिंधुदुर्गात १६ एप्रिल पर्यंत मनाई आदेश : जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 01:56 PM2022-04-02T13:56:38+5:302022-04-02T13:56:56+5:30
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ ...
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) आणि ३७ (३) नुसार प्राप्त झालेल्या अधिकारानुसार २ एप्रिल २०२२ रोजी पासून ते १६ एप्रिल २०२२ रोजी रात्री १२ वाजेपर्यंतच्या कालावधीत जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केला आहे.
या काळात जिल्ह्यात गुढीपाडवा, रमजान मास प्रारंभ, श्रीराम नवमी , जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, गुड फ्रायडे व हनुमान जयंती, तसेच वैयक्तिक मागणीकरिता आंदोलने, तसेच कोकण विभागीय मंडळातर्फे मार्च, एप्रिल- २०२२ मध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २०२२ ची इ.१० वी, दिनांक १५ मार्च ते ४ एप्रिल २०२२ या ४ कालावधीत परीक्षा आहेत.
या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संपूर्ण भूभागात खालील कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. या काळात कलम ३७ (१) नुसार शस्त्रे, साटे,तलवारी, भाले,दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यांसाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे. अंग भाजून टाकणार पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ घेवून फिरणे. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे जमा करणे किंवा तयार करणे. व्यक्तींची किवा प्रेते किंवा आक्रती किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, (ज्या कारणामुळे समाजाच्या भावना दुखविली जाण्याची शक्यता असते.)
सार्वजनिक रितीने आक्षेपार्ह घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजवीणे. वाजवीणे. सभ्यता अगर निती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे. कलम ३७(३) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच अगर पाचाहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे मिरवणूका काढणे व सभा घेणे.
आदेशाचे उल्लंघन झाल्यास कारवाई
वरील कालावधीतील मिरवणूकांना परवानगी देण्यांचे अधिकार तसेच ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांस सिंधुदुर्ग तसेच त्यांनी प्राधिकृत व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकायांस राहील. या आदेशाचे उल्लंघन करणारा महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.