पानसरे हल्ल्याचा पुरोगामी संघटनांकडून निषेध

By Admin | Published: February 19, 2015 09:57 PM2015-02-19T21:57:36+5:302015-02-19T23:49:42+5:30

सावंतवाडीत कार्यक्रम : हल्लेखोर लवकर पकडण्याची मागणी

Prohibition by Pansare attacking progressive organizations | पानसरे हल्ल्याचा पुरोगामी संघटनांकडून निषेध

पानसरे हल्ल्याचा पुरोगामी संघटनांकडून निषेध

googlenewsNext

सावंतवाडी : पुरोगामी चळवळीतील अग्रणी नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नीवर सोमवारी सकाळी भरदिवसा कोल्हापूर शाहूनगरीत अज्ञातांकडून झालेल्या भ्याड हल्ल्याचा बुधवारी सिंधुुदुर्ग जिल्ह्यातील पुरोगामी विचारधारेच्या संघटनांमार्फत सावंतवाडी येथील केशवसूत कट्टा येथे निषेध करण्यात आला. यावेळी अ‍ॅड. संदीप निंबाळकर, ज्येष्ठ समाजवादी गोपाळराव दुखंडे, महेश परुळेकर, हरिहर वाटवे, प्रा. प्रवीण बांदेकर, मधुकर मातोंडकर, आदी उपस्थित होते. यावेळी अ‍ॅड. निंबाळकर म्हणाले, पुरोगामी विचाराच्या माणसांना संपविण्याचे काम हल्लेखोर करीत आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना फोनवरून अनेक धमक्या येत असत. त्यानंतर त्यांचा खून करण्यात आला. अ‍ॅड. गोविंद पानसरे यांनाही अशाचप्रकारे फोन येत असत. यानंतर त्यांचाही गोळ्या घालून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या दोघांनी टोलविरोधात लढा उभा केला होता. तसेच ते श्रमिक कष्टकरी कामगारांचे पुढारी म्हणून कार्यरत होते. समाजाला दिशा देण्याचे काम करणाऱ्या अशा नेत्यांना टार्गेट केले जात आहे. त्यामुळे अशा हल्लेखोरांना लवकरात लवकर पकडण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली.
डॉ. पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे यादेखील या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्या व्यवस्थित झाल्यानंतर त्यांना सावंतवाडी येथे आणणार असल्याचे यावेळी अ‍ॅड. निंबाळकर यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Prohibition by Pansare attacking progressive organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.