सिंधुदुर्ग जिल्ह्यात २९ सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश - निवासी जिल्हाधिकारी

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: September 16, 2022 07:28 PM2022-09-16T19:28:38+5:302022-09-16T19:29:58+5:30

निवासी जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी लागू केला आदेश

Prohibitory order till September 29 in Sindhudurg district | सिंधुदुर्ग जिल्ह्यात २९ सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश - निवासी जिल्हाधिकारी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २९ सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश - निवासी जिल्हाधिकारी

googlenewsNext

सिंधुदुर्ग : घटस्थापना, नवरात्रोत्सवाला २६ सप्टेंबर रोजी आरंभ होणार आहे. उत्सवाच्या काळात धार्मिक देवकार्य करताना मानापानावरुन वाद होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकाळात जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये,तसेच जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी. यासाठी निवासी जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार आज, शुक्रवारपासून २९ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश लागू केला आहे.

राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते राज्यभरात आक्रमक आहेत. काही राजकीय पक्षातील प्रतिस्पर्धी गट आपापल्या कार्यकर्त्यांची जमवाजमव करुन एकमेकांना लक्ष करत असून त्यातून काही ठिकाणी आंदोलनात्मक घटना घडलेल्या आहेत. त्याचे पडसाद सिंधुदुर्ग जिल्ह्यात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक मागणीकरिता उपोषणे, मोर्चा, निदर्शने, रास्ता रोको वैगरे सारखे आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Prohibitory order till September 29 in Sindhudurg district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.