‘ड्रोन’चा प्रस्ताव मत्स्य विभागाला सादर

By admin | Published: October 9, 2015 01:16 AM2015-10-09T01:16:42+5:302015-10-09T01:28:31+5:30

मत्स्योद्योगमंत्र्यांचे निर्देश : मंजुरीसाठी शासन दरबारी भाजप प्रयत्नशील

Proposal for 'drone' presented to Fisheries Department | ‘ड्रोन’चा प्रस्ताव मत्स्य विभागाला सादर

‘ड्रोन’चा प्रस्ताव मत्स्य विभागाला सादर

Next

मालवण : मालवण येथील मच्छिमारांच्या शिष्टमंडळाने मत्स्योद्योग मंत्र्यांना मंत्रालयात दाखविलेल्या ड्रोन प्रणालीच्या सादरीकरण व भविष्यातील ड्रोनची उपयुक्तता याची माहिती दिल्यावर मत्स्योद्योगमंत्री एकनाथ खडसे यांनी तातडीने ड्रोन प्रणालीवर कार्यवाही केली जावी असे निर्देश मत्स्य विभागाला दिले आहेत. मत्स्य विभागाने ड्रोन विषयीची माहिती सादर करावी असे पत्र नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे रविकिरण तोरसकर यांना पाठविलेले होते. याबाबत तोरसकर व त्यांच्या मच्छीमार शिष्टमंडळाने परिपूर्ण प्रस्ताव सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी एस. बी. डोंगळे यांच्याकडे सादर केला.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी शासन दरबारी मत्स्य विभागाने लवकरात लवकर प्रस्ताव पाठवावा. प्रस्तावाला मंजुरी मिळविण्यासाठी भाजप प्रयत्नशील राहील, असे मच्छीमाराना सांगितले. यावेळी मच्छिमार नेते छोटू सावजी, दिलीप घारे, बाबी जोगी, भाजपा तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, शहर अध्यक्ष दादा वाघ, विजय केनवडेकर, गणेश कुशे, आपा लुडबे, मनोज मोंडकर आदी उपस्थित होते.
सागरी सुरक्षा आणि परप्रांतीय ट्रॉलर्स १० वावच्या आत येवून करीत असलेली मासळीची लयलूट रोखण्यासाठी पारंपारिक मच्छीमारांनी जुलै महिन्यात घेतलेल्या ड्रोन प्रणालीच्या यशस्वी चाचणी घेतली होती. श्रमिक मच्छीमार, नॅशनल फिश वर्कर्स फोरम, रापण श्रमजीवी संघाच्या शिष्टमंडळाने महसूलमंत्री तथा मत्स्योद्योगमंत्री एकनाथ खडसे यांची मंत्रालयात भेट घेऊन ड्रोनचे सादरीकरण करून दाखवले होते. याबाबत मत्स्योद्योगमंत्र्यांनी मत्स्य विभागाला तातडीने ड्रोन प्रणालीवर कार्यवाही केली जावी असे निर्देश दिले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Proposal for 'drone' presented to Fisheries Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.