नोंदणीकृत अशासकीय संस्थांकडून ग्रॅन्ट इन एड साठी प्रस्ताव
By admin | Published: April 22, 2017 01:30 PM2017-04-22T13:30:34+5:302017-04-22T13:30:34+5:30
पुर्तता केलेले प्रस्ताव दिनांक ५ जून पर्यत पाठवा
आॅनलाईन लोकमत
सिंधुदुर्गनगरी,दि. २१ : सर्वसामान्य जनतेमध्ये कायदेविषयक जागृती व्हावी, कायदेविषयक ज्ञानाची माहिती सर्र्वाना व्हावी यासाठी कायदेविषयक शिबीरे आयोजित करण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांचेकडून अनुदान दिले जाते.
यासाठी इच्छुक नोंदणीकृत अशासकीय संस्थांनी आपले सन २०१७- १८ या वित्तीय आर्थिक वर्षाकरिताचे प्रस्ताव विहीत नमुन्यात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग मार्फत पाठवावयाचे आहेत.
प्रस्तावाचा नमुना आणि अन्य माहितीसाठी संबंधित उत्सूक नोंदणीकृत अशासकीय संस्थानी जिल्हा विधी सेवा प्रधिकरण, द्वारा जिल्हा व सत्र न्यायालय इमारत सिंधुदुर्ग- ओरोस यांचेकडे कार्यालयीन कामाचे दिवशी व वेळेत त्वरित संपर्क साधावा असे सदस्य सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग-ओरोस यांनी आवाहन केले आहे.
पूर्ण पुर्तता केलेले प्रस्ताव दिनांक ५ जून २०१७ पर्यत या कार्यालयाकडे पाठविणेत यावेत, त्यानंतर आलेल्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही.