संरक्षक भिंत गेली वाहून, आठ वाड्यांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 12:17 PM2020-07-25T12:17:16+5:302020-07-25T12:19:01+5:30

नाटळ रामेश्वर मंदिरानजीक पुलाची संरक्षक भिंत पुराच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेल्याने एसटी वाहतूक व पादचारी मार्ग बंद झाला आहे. यामुळे सुमारे आठ वाड्यांचा संपर्क तुटला आहे.

The protective wall was carried away, and the connection of the eight castles was lost | संरक्षक भिंत गेली वाहून, आठ वाड्यांचा संपर्क तुटला

नाटळ रामेश्वर मंदिरानजीक पुलाची संरक्षक भिंत वाहून गेल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे.

Next
ठळक मुद्देसंरक्षक भिंत गेली वाहून, आठ वाड्यांचा संपर्क तुटलानाटळ रामेश्वर मंदिरानजीकचा पूल

कनेडी : नाटळ रामेश्वर मंदिरानजीक पुलाची संरक्षक भिंत पुराच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेल्याने एसटी वाहतूक व पादचारी मार्ग बंद झाला आहे. यामुळे सुमारे आठ वाड्यांचा संपर्क तुटला आहे.

सुमारे तीस वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या कॉजवेला एक संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. या संरक्षक भिंतीला गेल्या दोन वर्षांपूर्वी तडे गेले होते. दरवर्षी मोठे पूर येत असल्याने पुलावरून पाणी जाऊन या भिंतीला जोरदार तडाखे बसत होते. त्यामुळे भिंतीचा खालील भाग पोखरत जाऊन भिंतीला तडे गेले आहेत.

रात्रीच्या वेळी येणाऱ्या वाहनधारकांना रस्ता तुटल्याने अपघाताचीही शक्यता वाढली आहे. तसेच पुलावरील सिमेंट तुटल्याने तारेवरची कसरत करीत वाहनचालकांना वाहने चालवावी लागत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेत वाहतूक सुरळीत करण्याची मागणी वाहतूकदारांमधून होत आहे.

गतवर्षी युवकांनी केली होती श्रमदानाने डागडुजी

४गेल्या वर्षी ही भिंत वाहून गेली होती. परंतु माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्या सहकार्याने येथील युवकांनी श्रमदानाने त्याची डागडुजी केली होती. त्यामुळे आठ दिवस बंद असलेली एसटी पुन्हा या मार्गाने धावू लागली. परंतु यावर्षी अद्यापही याची डागडुजी झालेली नाही.

गेले पाच-सहा दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे या भागातील गडनदीला मोठा पूर आला होता. पुराच्या जोरदार प्रवाहामुळे संरक्षक भिंत वाहून गेली आहे. यामुळे धाकटे मोहुळ, थोरले मोहुळ, तळेवाडी, हुमलेटेंब, खरवडे टेंब, विकासवाडी, मोगरणेवाडी, गुरववाडी या वाड्यांचा संपर्क तुटला आहे.

 

Web Title: The protective wall was carried away, and the connection of the eight castles was lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.