केर पुलावर संरक्षक कठडे आवश्यक
By admin | Published: May 22, 2014 01:00 AM2014-05-22T01:00:05+5:302014-05-22T01:01:31+5:30
ग्रामस्थांतून होत आहे मागणी
दोडामार्ग : केर गावच्या नदी पुलावरील वाहून गेलेले संरक्षक कठडे पावसाळयात अधून- मधून पुलावरुन पाण्याचा प्रवाह चालूच असतो. गतवर्षी पावसाच्या तडाख्यामुळे पुलावरील संरक्षक कठडे पूर्णपणे वाहून गेले आहेत. व काही प्रमाणात मोडकळीस आलेले आहेत. गावात या पुलावरुन एसटीच्या जवळपास आठ फेर्या व अन्य खाजगी वाहनांची वर्दळही बर्याच प्रमाणात असते. सदर पूल वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असून संरक्षक कठडे न घातल्यास भविष्यात वाहतुकीस धोका संभवू शकतो. त्यामुळे संबधित विभागाने याकडे वेळीच लक्ष घालण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. (प्रतिनिधी) काजू नुकसानीचीही भरपाई मिळावी बागायतदार शेतकर्यांची मागणी दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील शेतकर्यांचे वर्षांचे आर्थिक समीकरण सांभाळणार्या काजू उत्पादनाला बदलत्या वातावरणाचा फटका व आठवड्यापूर्वी झालेल्या चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. यावर्षी केवळ ४० टक्के उत्पन्न शेतकर्यांच्या पदरी आले आहे. त्यामुळे झालेल्या ६० टक्के नुकसानीची आंब्याप्रमाणेच काजू उत्पादनाच्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्यांतून होत आहे. तालुक्यात आंबा, भात, कोकम या पिकाखाली क्षेत्र असले तरी त्यांच्या तुलनेत काजू बागायतीखाली बरेचसे क्षेत्र आहे. येथील शेतकरी काजू उत्पादनावर आपल्या वर्षभराच्या पोटगी करत असतात. दरवर्षीच्या तुलनेत काजूला भाव ही चांगला होता. आणि त्याप्रमाणात बाजारपेठही उपलब्ध आहे. उन्ह, सावलीच्या खेळाला बदलत्या वातावरणाला काजू पिके बळी पडले त्याचप्रमाणे काजू उत्पादनही पूर्णपणे घटले आहे. गतवर्षी तालुक्यात काजू उत्पादन मोठ्या प्रमाणात होते पण त्याप्रमाणात त्याला भाव मिळत नव्हता. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात होता पण यावर्षी काजूला भाव चांगला असला तरी उत्पादनात मोठ्या प्रमाधात घट झाल्याचे दिसते. दरवर्षी ७० ते ८० टक्के उत्पादन असणार्या काजू पिक यावर्षी ४० टक्के झाले आहे. याकडे संबधित विभागाने लक्ष्र वेधून शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. वर्षभर शेतकर्यांना आर्र्थिक स्थिरता देणार्या या काजू पिकाबाबत यावर्षी कमालीची नाराजी बागायतदार शेतकर्यांत आहे. बागायतीसाठी घातलेले भांडवलही यावर्षी वसुल झाले नसल्यामुळे मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या उदरनिर्वाहाचा यावर्षीचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे कमी उत्पादनाअभावी झालेला तोटा लक्षात घेऊन शासनस्तरावरुन काजू बागायतदारांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी काजू बागायतदारांतून होत आहे. (प्रतिनिधी)