शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यातच शिक्षकांची वाणवा, शिवसेना ठाकरे गटाचे सावंतवाडीत आंदोलन

By अनंत खं.जाधव | Published: June 16, 2023 06:29 PM2023-06-16T18:29:42+5:302023-06-16T18:30:07+5:30

जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून स्थानिक बेरोजगार डी. एड धारकांना शिक्षक सेवक म्हणून रुजू करून घ्या, मात्र विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळा

Protest by Shiv Sena Thackeray group in Sawantwadi demanding recruitment of teachers, Declaration against the Minister of School Education | शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यातच शिक्षकांची वाणवा, शिवसेना ठाकरे गटाचे सावंतवाडीत आंदोलन

शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यातच शिक्षकांची वाणवा, शिवसेना ठाकरे गटाचे सावंतवाडीत आंदोलन

googlenewsNext

सावंतवाडी : जिल्ह्यातील इतर तालुक्याप्रमाणेच सावंतवाडी तालुक्यात ही शून्य शिक्षक शाळांमध्ये तात्काळ शिक्षक भरती करा, किंवा जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून स्थानिक बेरोजगार डी. एड धारकांना शिक्षक सेवक म्हणून रुजू करून घ्या, मात्र विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळा या मागणीसाठी शुक्रवारी ठाकरे शिवसेनेच्या वतीने सावंतवाडी पंचायत समिती कार्यालया समीर आंदोलन छेडण्यात आले. 

आंदोलना दरम्यान शिवसेना ठाकरे गटाने शालेय शिक्षण मंत्र्याच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.यावेळी जिल्हा महिला प्रमुख जानवी सावंत, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, चंद्रकांत कासार, बाळा गावडे, जिल्हा परिषद माजी सदस्य मायकल डिसोजा, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, योगेश नाईक, महिला तालुकाप्रमुख भारती कासार, उल्हास परब, श्रुतिका दळवी, उदय पारिपत्ते, रमेश गावकर, अशोक धुरी, संदीप प्रभू, योगेश गोवेकर आदींसह मोठ्या संख्येने ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र शून्य शिक्षकाअभावी शाळा बंद पडत चालल्या आहेत. या विरोधात शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. येथील पंचायत समिती समोर झालेल्या आंदोलनावेळी ठाकरे गटाकडून शासनाचा निषेध केला तसेच शालेय शिक्षण मंत्र्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.

यावेळी पडते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४० शिक्षक परजिल्ह्यात काम करत आहेत. तर जिल्हाअंतर्गत बदलीतून ४५३ शिक्षकांच्या नुकत्याच बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात १२१ शाळांमध्ये शून्य शिक्षक आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणार आहे. खरंतर जिल्हांतर्गत शिक्षक बदली करताना पहिल्यांदा या ठिकाणची शिक्षक पदे भरली पाहिजे होती. मात्र तसे झाले नाही.

तर दुसरीकडे शिक्षण मंत्री केसरकर हे आपल्या जिल्ह्यातीलच असून जिल्ह्यातील शिक्षण यंत्रणेची अशी केविलवाणी परिस्थिती निर्माण होणे ही बाब लांचनास्पद आहे. जिल्ह्यातील डी.एड बेरोजगारांनी केलेल्या आंदोलनानंतर महिन्याभरात प्रश्न सोडविला जाईल, असे आश्वासन केसरकर यांनी डी. एड बेरोजगार धारकांना दिले होते. मात्र आज दोन महिने उलटले तरी त्यांनी तो प्रश्न सोडविला नाही. 

जिल्ह्यातील डी. एड धारक बेरोजगारांना शिक्षक सेवक म्हणून रुजू करून घ्यावे. आणि जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे, अशी मागणी त्यांनी केली. तर येत्या दहा दिवसात शिक्षक भरतीचा प्रश्न न सुटल्यास शिवसेनेच्या माध्यमातून जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी शून्य शिक्षकी शाळातील विद्यार्थ्यांना पंचायत समितीत आणून बसविले जाईल, असा इशाराही त्यांनी ठाकरे शिवसेनेच्या वतीने दिला आहे.

Web Title: Protest by Shiv Sena Thackeray group in Sawantwadi demanding recruitment of teachers, Declaration against the Minister of School Education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.