मतिमंदांच्या शाळेला जीवनावश्यक वस्तू प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 04:23 PM2020-04-14T16:23:30+5:302020-04-14T16:23:47+5:30
देशात कोरोना या आजाराने थैमान घातले असल्याने संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे, हातावर पोट असणाऱ्या कष्टकरी कामगार वर्गाचे तसेच अनेक निराधार असणाºया लोकांचे हाल होत आहेत.
सावंतवाडी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाच्या माध्यमातून आंबेरी येथील मतिमंद मुलांच्या शाळेला जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख न्यायाधीश एस. आर. जगताप यांच्या संकल्पनेतून या वस्तू देण्यात आल्या.
देशात कोरोना या आजाराने थैमान घातले असल्याने संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे, हातावर पोट असणाऱ्या कष्टकरी कामगार वर्गाचे तसेच अनेक निराधार असणाºया लोकांचे हाल होत आहेत. सिंधुदुर्गात असणाºया आंबेरी येथील मतिमंद मुलांच्या शाळेला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. आर. जगताप यांच्या संकल्पनेतून व प्रेरणेतून सूचना मिळल्याप्रमाणे जिल्ह्यातील सर्व न्यायिक अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन या मतिमंद मुलांच्या शाळेला जीवनावश्यक वस्तू भेट दिल्या.
सावंतवाडी न्यायालयाच्या दिवाणी न्यायाधीश आर. आर. बेगडकर यांच्या हस्ते या वस्तू देण्यात आल्या. यावेळी न्यायालयीन सहाय्यक अधीक्षक भाग्यवंत वाडीकर उपस्थित होते. ही संकल्पना पूर्ण करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव दीपक म्हालटकर यांचे सहकार्य लाभले आहे.
सिंधुुदुर्ग जिल्हा न्यायालयाच्या माध्यमातून आंबेरी येथील मतिमंद मुलांच्या शाळेला दिवाणी न्यायाधीश आर. आर. बेगडकर यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. यावेळी भाग्यवंत वाडीकर उपस्थित होते.