पंतप्रधानांचे डिजिटल इंडियाचे स्वप्न साकारण्यासाठी चांगली सुविधा द्या: नितेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 06:36 PM2021-01-13T18:36:15+5:302021-01-13T18:38:07+5:30

Nitesh Rane Internet Sindhudurg- केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत ग्रामीण क्षेत्रातील ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी भारत नेट हा महत्वाकांक्षी प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केला आहे. त्या प्रकल्पाची अंमलबजावणी जिल्ह्यात काटेकोरपणे करा आणि जनतेला चांगली सुविधा उपलब्ध करून द्या. अशी सूचना आमदार नितेश राणे यांनी भारत नेटचे लोकेश श्रीवास्तव व बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना केली.

Provide good facilities for realizing the Prime Minister's dream of Digital India: Nitesh Rane | पंतप्रधानांचे डिजिटल इंडियाचे स्वप्न साकारण्यासाठी चांगली सुविधा द्या: नितेश राणे

कणकवली येथे आमदार नितेश राणे यांनी बीएसएनएल व भारत नेटच्या अधिकाऱ्यांशी बुधवारी चर्चा केली.

Next
ठळक मुद्दे पंतप्रधानांचे डिजिटल इंडियाचे स्वप्न साकारण्यासाठी चांगली सुविधा द्या: नितेश राणेभारत नेटचे लोकेश श्रीवास्तव व बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना सूचना

कणकवली : केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत ग्रामीण क्षेत्रातील ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी भारत नेट हा महत्वाकांक्षी प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केला आहे. त्या प्रकल्पाची अंमलबजावणी जिल्ह्यात काटेकोरपणे करा आणि जनतेला चांगली सुविधा उपलब्ध करून द्या. अशी सूचना आमदार नितेश राणे यांनी भारत नेटचे लोकेश श्रीवास्तव व बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना केली.

कणकवली येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भारत नेट फायबर ऑप्टिकल केबलने जोडलेल्या कनेक्शनच्या समस्या तसेच बीएसएनएलच्या त्रूटी संदर्भात अधिकाऱ्यांसमवेत आमदार नितेश राणे यांनी बुधवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीला केंद्रिय अधिकारी लोकेश श्रीवास्तव,बीएसएनएलचे सुभाष कांबळे, भारत नेटचे जिल्हा व्यवस्थापक सुशांत राणे, श्रीकृष्ण धुरी,चेतन गावकर,सम्राट गावडे,गुरुनाथ शिर्के आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी नितेश राणे यांनी संबधित अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत ग्रामीण क्षेत्रातील ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी भारत नेट या महत्वाकांक्षी कार्यक्रमाची अंमलबजावणी कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) म्हणजे (आपले सरकार सेवा केंद्र) यांच्यामार्फत केली जात आहे. त्या अनुषंगाने बीएसएनएल व सीएससी यांचा संयुक्तिक करार झालेला असून त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ही सीएससीकडे सोपविण्यात आलेली आहे. अशी माहिती देण्यात आली.

बीएसएनएल व सीएससी यानी भारत नेट कार्यक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत एकूण ३६१ ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडल्या आहेत. त्यापैकी २९७ ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट सेवा बीबीएनएल व सिएससी मार्फत कार्यान्वित झालेली आहेत.

इंटरनेट सेवा ज्या ग्रामपंचायतींमध्ये सीएससी मार्फत कार्यान्वित आहे त्या ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट सेवा सुरू झालेल्या दिवसापासून पुढील एक वर्ष पुर्णपणे मोफत असणार आहे. उर्वरित ग्रामपंचायतींचे काम प्रगतिपथावर आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत क्षेत्रातिल इतर ५ सरकारी आस्थापनामध्येही इंटरनेटची जोडणी या प्रकल्पा अंतर्गत केली जात आहे,अशी माहिती लोकेश श्रीवास्तव यांनी दिली.

यावेळी जिल्ह्यातील अडचणींबाबत चर्चा करण्यात आली. गावागावात नेटवर्क मिळत नाही. इंटरनेटची सोया नाही , याची कारणे काय ?याबाबत डिजिटल इंडियाच्या समन्वयकांशी चर्चा करण्यात आली. अखेर ज्या समस्या आहेत त्या दिल्लीत मांडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारत नेट इंटरनेट सेवा चांगल्याप्रकारे देण्यासंदर्भात लागणारी यंत्रणा व व्यवस्थेची मागणी केंद्रीय मंत्री यांच्याकडे करणार असल्याचे श्रीवास्तव यांनी सांगितले.

त्यानंतर दर महिन्याला डिजिटल इंडियाच्या बाबत अहवाल आमच्या कार्यालयाला द्या तसेच ज्या ठिकाणी आता फायबर केबल जोडली आहे पण इंटरनेट सुविधा बंद आहे त्या दुरुस्त करा. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला आवश्यक मदत लागेल त्या ठिकाणी करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

तसेच जिल्ह्यात बीएसएनएलचे नेटवर्क कुठे आहे? ग्रामपंचायतमध्ये फायबर केबलने भारत नेट जोडलात तर मग ते बंद का ? नरेंद्र मोदी यांचे स्वप्न केव्हा साकार होणार ? सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे, नेटवर्क नसेल तर पर्यटक कसे येणार ? अशी विचारणा बीएसएनएलचे अधिकारी व डिजिटल इंडिया भारत नेटच्या स्थानिक अधिकाऱ्यांना आमदार नितेश राणे यांनी केली.त्यावर श्रीवास्तव यांनी येत्या महिन्याभरात सेवा सुरळीत करून देण्यासंदर्भात आश्वासन दिले.

Web Title: Provide good facilities for realizing the Prime Minister's dream of Digital India: Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.