सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटनाच्या पायाभूत सुविधा देणार; शिंदेंची घोषणा

By अनंत खं.जाधव | Published: June 6, 2023 02:17 PM2023-06-06T14:17:47+5:302023-06-06T14:17:56+5:30

सावंतवाडीत विविध विकास कामांची भूमिपूजन 

Provide tourism infrastructure to Sindhudurg district; Shinde's announcement | सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटनाच्या पायाभूत सुविधा देणार; शिंदेंची घोषणा

सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटनाच्या पायाभूत सुविधा देणार; शिंदेंची घोषणा

googlenewsNext

सावंतवाडी : देशात सर्वात जास्त पायाभूत सुविधांचे प्रकल्प हे महाराष्ट्र राज्यात सुरू असून त्यामुळेच महाराष्ट्र विकसात अग्रेसर आहे. त्याच पध्दतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन दृष्ट्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

मंगळवारी साव॔तवाडी येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर,आरोग्य मंत्री तानाजी सावंत,पालकमंत्री रविंद्र चव्हाण,उद्योगमंत्री उदय सामंत,ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आमदार रविंद्र फाटक आमदार भरत गोगावले,माजी आमदार राजन तेली जिल्हाधिकारी के.मजूंलक्ष्मी,मुख्य कार्यकारी अधिकारी  प्रजित नायर,पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल आदि उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,केंद्राने नेहमीच महाराष्ट्रावर प्रेम केले असून आम्ही पाठवलेला एकही प्रस्ताव केंद्र सरकार मागे पाठवत नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रावर विशेष प्रेम आहे.त्यामुळे आपले डबल इंजिन सरकार तेवढ्याच गतीने विकास करेल सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणारा सागरी महामार्ग हा नक्कीच विकास आणि रोजगार याचे सांगड घालेल तसेच आंबोली येथे हिल स्टेशन उभारण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.यावेळी त्यानी सावंतवाडीला आता पर्यंत कधीच एवढा निधी मिळाला नव्हता तेवढा निधी आपण उपलब्ध करून दिला असून लोकांचे सरकार असल्यानेच हे सर्व शक्य झाले असे ही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
यावेळी केंद्रिय मंत्री नारायण राणे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

Web Title: Provide tourism infrastructure to Sindhudurg district; Shinde's announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.