मांसल पक्षी उपलब्ध करून देण्यासाठी २४ लाखांची तरतूद

By Admin | Published: September 3, 2016 08:56 PM2016-09-03T20:56:53+5:302016-09-04T00:33:18+5:30

उर्वरित पैशांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बॅँकेने कर्ज योजना अमलात आणली आहे. या योजनेसाठी जिल्हा परिषदने पाच लाख रुपयांची तरतूद

Provision of Rs 24 lakh for providing beefy birds | मांसल पक्षी उपलब्ध करून देण्यासाठी २४ लाखांची तरतूद

मांसल पक्षी उपलब्ध करून देण्यासाठी २४ लाखांची तरतूद

googlenewsNext

ओरोस : सिंधुदुर्गसह पाच जिल्ह्यांसाठी कोल्हापूर येथे एकच अंडी उबवणी केंद्र आहे. पाच जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात येथे पिल्लांची मागणी असते. मागणी प्रमाणे पुरवठा करणे या केंद्राला शक्य होत नाही. त्यामुळे गतवर्षी आपल्याला कुक्कुट पालन योजनेअंतर्गत मांसल पक्षी पुरविण्यात हे केंद्र असमर्थ ठरले होते. तसे लेखी पत्रही या केंद्राने दिले असून, गेल्या वर्षीची मागणी यावर्षी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी पशुधन विभागाने गेल्या वर्षीचे १२ लाख व यावर्षी १२ लाख अशी मिळून २४ लाखांची आर्थिक तरतूद केली आहे. त्या अनुषंगाने या केंद्राकडून वेळोवेळी मांसल पक्षी उपलब्ध करून लाभार्थ्यांना वाटप करण्याचे नियोजन सुरू असल्याचे प्रभारी जिल्हा पशुधन अधिकारी डॉ. व्ही. एफ. देसाई यांनी पशुधन व दुग्ध व्यवसाय समितीच्या सभेत सांगितले. समितीची तहकूब सभा उपाध्यक्ष तथा समिती सभापती एकनाथ नाडकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, वेंगुर्लेच्या सभापती सुचिता वजराठकर यांसह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी देसाई म्हणाले की, जिल्हा परिषदेने अंड्यावरील पक्षी देण्याची योजना आखली आहे. एका लाभार्थ्याला १६ आठवड्यांची ३०० पिल्ले देण्यात येणार आहेत. याकरिता पिंजरा, खाद्यपदार्थ मिळून एक लाखाचा खर्च अपेक्षित आहे. यातील २० हजार रुपये अनुदान पशुधन विभागाच्यावतीने देण्यात येणार आहे. उर्वरित पैशांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बॅँकेने कर्ज योजना अमलात आणली आहे. या योजनेसाठी जिल्हा परिषदने पाच लाख रुपयांची तरतूद केली आहे. यातून किमान २५ लाभार्थ्यांना अनुदान मिळणार आहे. पक्षासाठी ५६ हजार रुपये, पिंजऱ्याकरिता ३६ हजार रुपये अशा प्रकारे खर्च अपेक्षित आहे. या योजनेतून पुढील तीन वर्षांत कुक्कुटपालन व्यवसाय रुजविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे
डॉ. देसाई म्हणाले. (वार्ताहर)

Web Title: Provision of Rs 24 lakh for providing beefy birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.