अमित शहा, योगी आदित्यनाथ, फडणवीस रत्नागिरी-सिधुदुर्गात येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 02:01 PM2024-04-26T14:01:03+5:302024-04-26T14:03:03+5:30
कणकवली : रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री ...
कणकवली : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जाहीर सभा होणार आहेत, अशी माहिती माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिली.
ते म्हणाले, शुक्रवार, दि. २६ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता राजापूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. १ मे रोजी कुडाळ येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा होणार आहे. तर ३ मे रोजी रत्नागिरी येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची जाहीर सभा होणार आहे.