जनता गुण्यागोविंदाने नांदेल असे काम करेन :

By admin | Published: July 18, 2016 10:51 PM2016-07-18T22:51:52+5:302016-07-19T00:22:15+5:30

दीपक केसरकर

Public work will be done as a person | जनता गुण्यागोविंदाने नांदेल असे काम करेन :

जनता गुण्यागोविंदाने नांदेल असे काम करेन :

Next

सावंतवाडी : सावंतवाडीतील माझ्या लोकांनी उच्च शिखरावर नेवून बसवले आहे. त्यांचा विसर मी कधीच पडू देणार नाही. पण गृहराज्यमंत्री या नात्याने राज्य गुण्यागोविंदाने नांदण्यासाठी सर्व प्रयत्न करेन, असे मत राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मांडले.येथील बॅ. नाथ पै सभागृहात दीपकभाई मित्रमंडळीच्यावतीने दीपक केसरकर यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र, अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डीे येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणावर विधानसभा सभागृहात निवेदन सादर करायचे असल्याने ते उपस्थित राहू शकले नसल्याने त्यांनी उपस्थित नागरिक व कार्यकर्त्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला तसेच मार्गदर्शन केले.
यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, संजय भोगटे, प्रकाश परब, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, नगरसेविक साक्षी कुडतरकर, क्षिप्रा सावंत, कीर्ती बोंद्रे, अफरोझ राजगुरू, शुभांगी सुकी, अ‍ॅड. सुभाष पणदूरकर, बाबू कुडतरकर, अनिता भाईडकर, भाई देऊलकर, काशिनाथ दुभाषी, सचिन इंगळे आदी उपस्थित होते.
यावेळी गृहराज्यमंत्री केसरकर म्हणाले, मी आज काही कारणाने अनुपस्थित रहात आहे. पण येथील जनतेने माझ्यासाठी जे काही केले आहे, ते मी कधीही विसरणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था राखणे जशी आपली जबाबदारी आहे, तसाच महाराष्ट्राकडेही लक्ष द्यायचा आहे. राज्यात गुण्यागोविंदाने लोक नांदले पाहिजेत, असा माझा प्रयत्न आहे. तशी जबाबदारीच माझ्यावर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ती मी आपल्या सहकार्याने पूर्ण करेन, असे सांगत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जास्तीत जास्त विकास झाला पाहिजे. निधी आला पाहिजे, यादृष्टीने माझा प्रयत्न असणार असल्याचेही यावेळी केसरकर यांनी स्पष्ट केले.
नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले, दीपक केसरकर यांच्याशी माझे गेल्या २० वर्षांचे ऋणानुबंध आहेत. त्यांच्या घरात कोणीही राजकारणात नसताना दीपक केसरकर यांनी घेतलेली झेप बघण्यासाठी त्यांचे आईवडील असायला हवे होते. पण आज ते नाहीत. त्यांना मुलाच्या यशाचा अधिक आनंद झाला असता, असेही ते म्हणाले. येथील जनतेने केलेले प्रेम ते कधीही विसरणार नाहीत, असे अभिवचनही साळगावकर यांनी यावेळी दिले. महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. लहान मुलांच्या हस्ते केक कापण्यात आला. यावेळी राजन पोकळे, प्रकाश परब यांनीही आपले विचार
मांडले. (प्रतिनिधी)

Web Title: Public work will be done as a person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.