आंबोलीत आलेल्या २६ पर्यटकांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 11:49 AM2021-06-16T11:49:38+5:302021-06-16T11:52:01+5:30

CoronaVIrus In Sindhudurg- आंबोली मध्ये एकूण २६ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. प्रशासनाच्या नियमांची कडक अंमलबजावणी सर्वत्र सुरू आहे.

Punitive action against 26 tourists who came to Amboli | आंबोलीत आलेल्या २६ पर्यटकांवर दंडात्मक कारवाई

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू झालेल्या पावसामुळे आंबोलीमध्ये चोहोबाजूला हिरवागार निसर्ग पहायला मिळत आहे. आंबोली येथील मुख्य धबधबाही पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे.(छाया: महादेव भिसे)

googlenewsNext
ठळक मुद्देआंबोलीत आलेल्या २६ पर्यटकांवर दंडात्मक कारवाई ई-पास बंदी कायम : पोलिसांची कडक अंमलबजावणी

आंबोली : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ई-पास बंद केला आहे. यामुळे त्या जिल्ह्यातील लोकांचा गैरसमज झाला आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाससुद्धा बंद झाला असेल. या गैरसमजापोटी बेळगाव, सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच आजूबाजूच्या शहरांमधील नागरिक आंबोलीतील वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आंबोलीच्या दिशेने येत असल्याचे चित्र रविवारी आंबोलीत बघायला मिळाले. यावेळी पोलिसांनी या पर्यटकांना हुसकावून लावले.
दरम्यान, रविवारी आंबोली मध्ये एकूण २६ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. प्रशासनाच्या नियमांची कडक अंमलबजावणी सर्वत्र सुरू आहे.

आंबोली हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार असल्याने या ठिकाणी अद्यापही ई-पास सक्ती आहे. नेमकी हीच गोष्ट इतर जिल्ह्यातील लोकांना माहीत नसल्याने अनावधानाने ते आंबोलीपर्यंत पोहोचले आहेत.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार अशा पर्यटकांना सामंजस्याने पोलिसांनी समजावून परत पाठविले पाहिजे. आंबोली ग्रामपंचायतीने अद्यापही पर्यटन बंदी लागू केलेली आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी २१ जूनपर्यंत निर्बंध तसेच ठेवलेले असल्यामुळे पर्यटन निदान २१ तारीखपर्यंत सुरू होईल असे वाटत नाही. पर्यटन बंदी कायम राहणार आहे.

मुख्य धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित

मे महिन्याच्या दहा तारीखपासून सुरू झालेल्या पावसामुळे आंबोलीमध्ये चोहोबाजूला हिरवागार निसर्ग पहायला मिळत असून मुख्य धबधबाही पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना या ठिकाणी थांबून फोटो काढण्याचा मोह आवरत नसल्याचे बघायला मिळाले. यावेळी आंबोली पोलीस ठाण्यामधून एक पोलीस व एक होमगार्ड या ठिकाणी थांबणाऱ्या पर्यटकांना अडविण्यासाठी ठेवण्यात आल्याचे दिसून आले.

Web Title: Punitive action against 26 tourists who came to Amboli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.