सिंधुदुर्गात एका दिवसात 356 व्यक्तींवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 01:56 PM2021-02-26T13:56:47+5:302021-02-26T13:59:04+5:30
corona virus Sindudurg - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात कोविडच्या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमिवर जिल्ह्यात विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. काल दिवसभरात 356 व्यक्तींवर मास्क वापरत नसल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली.
सिंधुदुर्ग : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात कोविडच्या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमिवर जिल्ह्यात विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. काल दिवसभरात 356 व्यक्तींवर मास्क वापरत नसल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली.
यामध्ये महसूल विभागाने काल एका दिवसात 31 व्यक्तींवर कारवाई करत एकूण 7 हजार 400 रुपयांचा दंड वसूल केला आहे.👉तर पोलिसांनी 268 व्यक्तींवर कारवाई करत एकूण 53 हजार 600 रुपयांचा दंड वसूल केला आहे. नगर पालिका क्षेत्रामध्ये 55 व्यक्ती या विनामास्क आढळून आल्या असून त्यांच्याकडून एकूण 11 हजार रुपये दंड वसूल केला आहे.जिल्ह्याच्या ग्रामिण भागामध्ये 2 व्यक्तींवर मास्क वापरत नसल्याप्रकरणी कारवाई करून त्यांच्याकडून 400 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
काल दिवसभरात वसूल करण्यात आलेल्या एकूण दंडाची रक्कम ही 72 हजार 400 रुपये इतकी आहे. त्याशिवाय जिल्ह्यातील महसूल, पोलीस आणि नगर पालिका प्रशासनाकडून एकूण 136 ठिकाणांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये 4 ठिकाणी कोविडच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी कोविडच्या नियमांचे पालन करावे, मास्क, हॅन्ड सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतराचे पालन करावे, असे आवाहन नागरिकांना जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
वेंगुर्ला पोलिसांनीही दोन दिवसांत 95 मास्क न घालता फिरत असलेल्यांना प्रत्येकी 200 रू प्रमाणे 19 हजार रूपये दंड केला पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली केसरकर, शेखर दाभोलकर, तुकाराम जाधव, भगवान चव्हाण, हवालदार रमेश तावडे, वाहतूक पोलीस मनोज परूळेकर पांडुरंग खडपकर यांनी कारवाईत भाग घेतला.