शेतकऱ्यांना पावर ट्रीलर मिळण्यासाठी पाठपुरावा करा - खासदार विनायक राऊत
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: July 7, 2023 05:52 PM2023-07-07T17:52:52+5:302023-07-07T17:53:19+5:30
सिंधुदुर्ग : शेतकऱ्यांना पावर ट्रीलर मिळवून देण्यासाठी कृषी विभागाने राज्यस्तरावर पाठपुरवा करावा, असे निर्देश खासदार विनायक राऊत यांनी शुक्रवारी ...
सिंधुदुर्ग : शेतकऱ्यांना पावर ट्रीलर मिळवून देण्यासाठी कृषी विभागाने राज्यस्तरावर पाठपुरवा करावा, असे निर्देश खासदार विनायक राऊत यांनी शुक्रवारी कृषी विभागाला दिले.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) ची सभा झाली. या सभेला आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, उपवनसंरक्षक नवकिशोर रड्डी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. उदय पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे आदी उपस्थित होते.
खासदार राऊत यांनी विषय निहाय सविस्तर आढावा घेतला ते म्हणाले, पावसाळ्यात रस्त्यांवर विशेषत: घाट मार्गावर अपघात होणार नाहीत यांची दक्षता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घ्यावी. आंबोली बसस्थानक परिसरातील स्वच्छतागृह सुविधा उपलब्ध करुन द्यावे. पुनवर्सन विभागाने संकलन यादीची छाननी करुन अहवाल तयार करुन द्यावा. शेती उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना पॉवर ट्रीलर मिळण्यासाठी लॅाटरी काढण्याबाबत पत्रव्यवहार करावा.
दूरसंचार विभागाने फोर जी सेवा देण्याबाबत प्रयत्न करावा. रेल्वेने प्रवाश्यांसाठी निवारा उभे करावेत. यावेळी गगनबावडा घाट मार्गात जेसीबी उपलब्ध करुन देण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला केली.