अध्यक्षांसह दिग्गजांना धक्का

By admin | Published: October 6, 2016 12:03 AM2016-10-06T00:03:00+5:302016-10-06T01:06:37+5:30

जिल्हा परिषद आरक्षण : दोन माजी अध्यक्षांचेही ‘गड’ गेले; चिपळुणात ९ पैकी ७ गटांमध्ये महिला

Push giants with chairs | अध्यक्षांसह दिग्गजांना धक्का

अध्यक्षांसह दिग्गजांना धक्का

Next

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या ५५ गटांसाठी बुधवारी दुपारी ३ वाजल्यानंतर झालेल्या आरक्षण सोडतीत मातब्बर नेत्यांना जबर फटका बसला आहे. जिल्हापरिषदेचे विद्यमान अध्यक्ष तुकाराम गोलमडे यांचा मालदोली जिल्हापरिषद गट महिला राखीव झाल्याने त्यांना सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागणार आहे. काही विद्यमान सदस्यांचे गटही आरक्षित झाल्याने त्यांची पंचाईत झाली आहे. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मनीषा जाधव व जगदीश राजापकर, माजी उपाध्यक्ष विश्वास सुर्वे यांनाही त्यांचे गट आरक्षित झाल्याने फटका बसला आहे. आरक्षणानंतर राजकीय घडामोडींना जिल्'ात वेग आला आहे.
रत्नागिरी जिल्हापरिषदेच्या ५५ गटांसाठी बुधवारी दुपारी ३ वाजता येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अल्पबचत सभागृहात जिल्हाधिकारी प्रदीप पी यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यावेळी जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोडत सुरू असताना सभागृहात उपस्थित असलेल्या सदस्यांच्या चेहऱ्यावर कधी आनंद तर कधी निराशेच्या छटा दिसून येत होत्या.
जिल्हा परिषदेच्या अनेक विद्यमान सदस्यांच्या गटात आरक्षण पडल्याने त्यांना फटका बसला आहे. उमरोली (मंडणगड) गटात सर्वसाधारण आरक्षण पडले असून, सेनेच्या समाजकल्याण सभापती शीतल प्रमोद जाधव यांना पुन्हा उमेदवारी मिळणार काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पालगड गटात मागासवर्गीय महिला आरक्षण पडल्याने विद्यमान सदस्य राजेंद्र फणसे यांना फटका बसला आहे. अलोरे (चिपळूण) गटात नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण पडल्याने माजी जिल्हापरिषद अध्यक्ष मनीषा जाधव यांना फटका बसला आहे. कळंबट गटात महिला आरक्षण पडल्याने विद्यमान सदस्य बाळकृष्ण जाधव यांना दुसरा सुरक्षित गट शोधावा लागणार आहे. कोकरे गटाच्या सदस्य माजी महिला बालकल्याण समिती सभापती प्रज्ञा धनावडे, रामपूर गटातील महेश काटकर यांच्या गटातील आरक्षण जैसे थे राहिल्याने त्यांना पुन्हा संधी मिळू शकते. पोफळी गटातील महिला आरक्षणामुळे सदस्य दीपक घाग यांना धक्का बसला आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर यांचा भांबेड (ता. लांजा) गट नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने त्यांनाही यावेळी दुसरा सुरक्षित गट शोधावा लागणार आहे.
जिल्हा परिषदेवर शिवसेनेच वर्चस्व असल्याने या आरक्षणाचा सर्वाधिक फटका व फायदाही शिवसेनेलाच झाला आहे. मावळत्या जिल्हा परिषदेचे ५७ गट आहेत. मात्र पुनर्रचनेत त्यातील २ गट कमी झाल्याने ५५ गटांसाठी आज ही सोडत घेण्यात आली. चिपळूणमधील ९ पैकी ७ जिल्हा परिषद गटात महिला आरक्षण झाल्याने तेथे महिलाराज येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र मातब्बर नेत्यांना या आरक्षण सोडतीने धक्का दिल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत. असे आहेत आरक्षित गट
रत्नागिरी जिल्हा परिषदेतील ५५ गट आणि पडलेली आरक्षणे याप्रमाणे - शिरगाव-मंडणगड (अनुसुचित जमाती राखीव), उमरोली (सर्वसाधारण), केळशी (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), पालगड (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), हर्णे (सर्वसाधारण), जालगाव (सर्वसाधारण महिला), असोंड (नागरिकांचा मागास प्रवर्ग), बुरोंडी (सर्वसाधारण), अस्तान (सर्वसाधारण महिला), भरणे-खेड (सर्वसाधारण महिला), फुरुस (सर्वसाधारण), सुशेरी (सर्वसाधारण महिला), भोस्ते (सर्वसाधारण), लोटे (सर्वसाधारण), धामणदेवी (सर्वसाधारण), मालदोली (सर्वसाधारण महिला), पेढे (सर्वसाधारण महिला), खेर्डी (सर्वसाधारण महिला), अलोरे (नागरिकांचा मागास प्रवर्ग), पोफळी (सर्वसाधारण महिला), सावर्डे (सर्वसाधारण), रामपूर (सर्वसाधारण महिला), कळंबट (सर्वसाधारण महिला), कोकरे (सर्वसाधारण महिला), अंजनवेल (सर्वसाधारण), पालशेत (सर्वसाधारण), वेळणेश्वर (नागरिकांचा मागास प्रवर्ग), पडवे (सर्वसाधारण), वाटद (अनुसुचित जाती महिला), करबुडे (सर्वसाधारण), कोतवडे (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), शिरगाव (सर्वसाधारण महिला), मिरजोळे (सर्वसाधारण), हातखंबा (अनुसुचित जाती), नाचणे (सर्वसाधारण), हरचिरी (सर्वसाधारण महिला), गोळप (सर्वसाधारण महिला), पावस ( नागरिकांचा मागास प्रवर्ग), धामापूरतर्फे (नागरिकांचा मागास प्रवर्ग), कडवई (सर्वसाधारण), कसबा (सर्वसाधारण), नावडी (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), कोसुंब (सर्वसाधारण), ओझरे खुर्द (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), दाभोळे (सर्वसाधारण महिला), देवधे (नागरिकांचा मागास प्रवर्ग), भांबेड (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), वाकेड (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), गवाणे (सर्वसाधारण महिला), ओणी (नागरिकांचा मागास प्रवर्ग), पाचल (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), केळवली (सर्वसाधारण महिला), कोडवली (सर्वसाधारण महिला), देवाचे गोठणे (सर्वसाधारण), सागवे (सर्वसाधारण महिला). (प्रतिनिधी)


सोडतीवेळी महिलांची अत्यल्प उपस्थिती
जिल्हापरिषदेच्या आरक्षणासाठी अल्पबचत कार्यालयात मोठी गर्दी होती. या सोडतीमध्ये नियमानुसार ५० टक्के जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. मात्र आरक्षण सोडतीच्यावेळी महिलांची संख्या अत्यल्प होती. त्यामुळे महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळणाऱ्या आरक्षणाबाबत उदासिनता आहे काय, असा सवाल केला जात होता.
सिंधुदुर्गमध्ये अध्यक्षांसह २१ जणांना धक्का
सिंधुदुर्गनगरी : पुढील वर्षी होणारी जिल्हा परिषद निवडणूक ५० गटांची आरक्षण सोडतीत प्रभाग आरक्षित झाल्याने अनेक दिग्गजांंना धक्का बसला आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, बांधकाम सभापती दिलीप रावराणे, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांच्यासह २१ विद्यमान सदस्यांचा समावेश आहे. या सर्वांना नवे मतदारसंघ शोधावे लागणार आहेत. -/ वृत्त ८

Web Title: Push giants with chairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.