संदेश पारकर गटाला धक्का

By admin | Published: August 23, 2016 11:46 PM2016-08-23T23:46:27+5:302016-08-24T00:35:10+5:30

काँग्रेसच्या नगरसेवकांना नशिबाने दिली साथ : कणकवली नगरपंचायतीत विषय समिती सदस्य निवड

Push message crossing group | संदेश पारकर गटाला धक्का

संदेश पारकर गटाला धक्का

Next

कणकवली : येथील नगरपंचायतीच्या विषय समिती सदस्य निवडीसाठी आयोजित केलेल्या विशेष सभेत सत्ताधारी पारकर गट आणि काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दीक खडाजंगी झाली. काँग्रेसचा गट अधिकृत नसल्याचे सांगत प्रांताधिकाऱ्यांनी १२ नगरसेवकांमधून चिठ्ठीद्वारे समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बांधकाम, पर्यटन समितीसाठी सदस्य निवडीत तब्बल ४ नगरसेवकांना नशिबाने साथ दिली. त्यामुळे पारकर गटाच्या ताब्यात असलेले बांधकाम सभापतीपद काँग्रेसच्या ताब्यात गेल्याने काँग्रेसच्या नगरसेवकांना लॉटरी तर पारकर गटाला जोरदार धक्का बसला आहे.
कणकवली नगरपंचायत विषय समिती सदस्य निवडीसाठी मंगळवारी प. पू. भालचंद्र महाराज सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी संतोष भिसे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्यासह १६ नगरसेवक व २ स्वीकृत नगरसेवक उपस्थित होते. दरम्यान मंगळवारी झालेल्या नगरपंचायतीला सभेला माजी नगराध्यक्षा आणि पारकर समर्थक अ‍ॅड. प्रज्ञा खोत अनुपस्थित होत्या.
विषय समिती सदस्य निवडीसाठी आयोजित केलेल्या विशेष सभेला उपस्थित नसलेल्या नगरसेवकांना या प्रक्रियेतून वगळण्यात यावे, अशी मागणी करतानाच गेल्या वेळी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीच्यावेळी वेगळा नियम आणि आता कायदा बदलला का? असा प्रश्नही काँग्रेस नगरसेवकांनी यावेळी उपस्थित केला.
सत्ताधाऱ्यांवर आठ महिन्यात त्यांच्या गटातील नगरसेवक अविश्वासच दाखवत आहेत. असा टोला लगावतानाच माजी नगराध्यक्षा प्रज्ञा खोत सभेला अनुपस्थित रहात आहेत. असे का? याचे उत्तर सत्ताधाऱ्यांनी द्यावे. गेल्यावेळी काँग्रेसचा गट अधिकृत असताना तो का नाकारण्यात आला, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी व सत्ताधारी पारकर गटाला काँग्रेसचे नगरसेवक समीर नलावडे, गणेश हर्णे, अभिजित मुसळे यांनी याबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला.
त्यावर कन्हैया पारकर म्हणाले, १३ जणांचा गट अद्यापही कायम आहे. त्यामुळे प्रत्येक समितीत दोन-दोन सदस्य घेऊन आपण समित्या गठीत करुया. मात्र, पारकरांचे म्हणणे नाकारत आम्ही आठ नगरसेवकांचे पत्र पीठासन अधिकाऱ्यांकडे दिल्याचे समीर नलावडे यांनी यावेळी सांगितले.
१३ सदस्यांचा काँग्रेसचा गट अधिकृत नसल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे सभा तहकूब न करता चिठ्ठीद्वारे नगराध्यक्ष वगळता १२ नगरसेवकांमधून समिती सदस्य निवडण्यात आले.
२६ आॅगस्टला या समित्यांच्या सभापतींची निवड करण्यात येणार आहे. यावेळी संबंधित समिती सदस्य उपस्थित राहिले तरच त्यांना मतदानाचा अधिकार बजावता येईल. पण विषय समिती सदस्य निवड प्रक्रियेच्या वेळी एखादा सदस्य अनुपस्थित राहिल्यास सदस्य निवड प्रक्रियेत कोणतीही अडचण येत नसल्याचे निवडणूक अधिकारी संतोष भिसे यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे २६ आॅगस्ट रोजी नेमके काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)


नव्याने गठीत झालेल्या समित्या
महिला व बालकल्याण समिती : सुविधा साटम (काँग्रेस), प्रज्ञा खोत (पारकर गट), सुमेधा अंधारी (पारकर गट), नंदिनी धुमाळे (शिवसेना), बांधकाम-पर्यटन समिती : गौतम खुडकर (काँग्रेस), अभिजित मुसळे (काँग्रेस), किशोर राणे (काँग्रेस), मेघा गांगण (काँग्रेस), राजश्री धुमाळे (भाजप), आरोग्य समिती : किशोर राणे (काँग्रेस), मेघा गांगण (काँग्रेस), प्रज्ञा खोत (पारकर गट), राधाकृष्ण नार्वेकर (पारकर गट), सुशांत नाईक (शिवसेना), वित्त व पाणीपुरवठा : पदसिद्ध उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर (पारकर गट), मेघा गांगण (काँग्रेस), गणेश हर्णे (काँग्रेस), गौतम खुडकर (काँग्रेस), नंदिनी धुमाळे (शिवसेना) अशा सदस्यांची चिठ्ठीद्वारे १२ नगरसेवकांमधून निवड करून समित्या गठित करण्यात आल्या आहेत.

नगरपंचायतीतकेवळ सेना-भाजपचाच अधिकृत गट

Web Title: Push message crossing group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.