अध्यक्षांसह २१ जणांना धक्का

By admin | Published: October 6, 2016 12:10 AM2016-10-06T00:10:56+5:302016-10-06T01:15:36+5:30

जिल्हा परिषद आरक्षण : संग्राम प्रभुगावकर, दिलीप रावराणे यांच्यासह सर्वांना शोधावा लागेल नवीन मतदारसंघ

Pushing 21 people including the President | अध्यक्षांसह २१ जणांना धक्का

अध्यक्षांसह २१ जणांना धक्का

Next

सिंधुदुर्गनगरी : पुढील वर्षी होणारी जिल्हा परिषद निवडणूक ५० गटांची आरक्षण सोडतीत प्रभाग आरक्षित झाल्याने अनेक दिग्गजांंना धक्का बसला आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, बांधकाम सभापती दिलीप रावराणे, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांच्यासह २१ विद्यमान सदस्यांचा समावेश आहे. या सर्वांना नवे मतदारसंघ शोधावे लागणार आहेत. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली येथील जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हा परिषद गटांची आरक्षण सोडत बुधवारी काढण्यात आली.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी शरदचंद्र शिरोडकर, आदी उपस्थित होते. आरक्षण कोणत्या पद्धतीने काढले जाणार आहे. याचे विवेचन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केले. यामध्ये सुरुवातीला अनुसूचित जातीचे आरक्षण काढण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर जातनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. आरक्षण जाहीर होणार असल्याने जिल्हा परिषद अध्यक्षांसह दिग्गज सदस्यांनी सभागृहात हजेरी लावली होती. आरक्षण जसजसे जाहीर होत होते तसे दिग्गजांना धक्का बसत होता. (प्रतिनिधी)

यांना बसला फटका
बुधवारी जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीमुळे अनेक दिग्गजांचे पत्ते कट झाले. त्यात जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, सभापती दिलीप रावराणे, अंकुश जाधव, आत्माराम पालेकर, संदेश सावंत, सतीश सावंत, दीपलक्ष्मी पडते, रणजित देसाई, सदाशिव ओगले, जान्हवी सावंत, प्रकाश कवठणकर, समीर नाईक, सुरेश ढवळ, प्रमोद कामत, गुरुनाथ पेडणेकर, पंढरीनाथ राऊळ, भगवान फाटक, वंदना किनळेकर ,रेवती राणे, अनिल कांदळकर, धोंडू पवार यांचा समावेश आहे.


यांना निवडणूक लढविण्याची संधी
आरक्षण काही इच्छुकांच्या पथ्यावर पडल्याचे दिसून येते. त्यात देवगडचे जनार्दन तेली, जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, फोंडा मतदारसंघाचे मधुसुदन बांदिवडेकर, कळसुुली मतदारसंघातून सुगंधा दळवी, निकिता परब, स्नेहलता चोरगे, रमाकांत ताम्हणेकर, दादा कुबल, विकास कुडाळकर, अमरसेन सावंत, आबा मुंज (आंब्रड) यांना निवडणूक लढविण्याची संधी आहे.

Web Title: Pushing 21 people including the President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.