मुळस हेवाळे पुलाचा प्रश्न : उपोषण तीन दिवसांनी मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 05:17 PM2021-02-17T17:17:11+5:302021-02-17T17:19:01+5:30

pwd dodamarg sindhudurg- मुळस हेवाळे पुलासाठी गेले तीन दिवस सुरू असलेले उपोषण मागे घेण्यात आले. प्रशासनाच्या हलगर्जीपणावर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करून ह्यआर या पारह्णची भूमिका घेतली होती. मात्र, तिसऱ्या दिवशी बांधकामचे कार्यकारी अभियंता माने यांनी उपोषणस्थळी भेट घेऊन मार्चपर्यंत निविदा पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.

Question of Mulas Hewale Bridge: Fasting back three days | मुळस हेवाळे पुलाचा प्रश्न : उपोषण तीन दिवसांनी मागे

मुळस हेवाळे ग्रामस्थांनी लेखी निवेदनाअंती भाजप, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन उपोषण स्थगित केले.

Next
ठळक मुद्देमुळस हेवाळे पुलाचा प्रश्न : उपोषण तीन दिवसांनी मागे निविदा पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन

दोडमार्ग : मुळस हेवाळे पुलासाठी गेले तीन दिवस सुरू असलेले उपोषण मागे घेण्यात आले. प्रशासनाच्या हलगर्जीपणावर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करून ह्यआर या पारह्णची भूमिका घेतली होती. मात्र, तिसऱ्या दिवशी बांधकामचे कार्यकारी अभियंता माने यांनी उपोषणस्थळी भेट घेऊन मार्चपर्यंत निविदा पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.

मुळस हेवाळे पुलासाठी ग्रामस्थांची गेल्या वीस वर्षांपासूनची मागणी आहे. मागील काही वर्षांपासून पुलाच्या मागणीला ग्रामस्थांनी जोर लावला होता. अधिकारी व नेत्यांकडून आश्वासनांची आमिषे दाखविण्यात येत होती. त्यामुळे सुसज्ज पूल स्वप्न लवकरात लवकर साकार होईल या आशेवर ग्रामस्थ होते.

गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीत सध्या असलेला लहान कॉजवे पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेला. कॉजवे वाहून गेला याठिकाणीच ग्रामस्थानी दोन-तीन महिन्यांपूर्वी उपोषण छेडले होते. यावेळी तिलारी पाटबंधारे विभागाने ज्याठिकाणी कॉजवे वाहून गेला तेथे काँक्रीट टाकून रहदारी सुरू राहील, अशी व्यवस्था करणार असल्याचे लेखी पात्र दिले होते. मात्र, वाहून गेलेला कॉजवे ह्यजैसे थेह्ण आहे.

नाबार्ड अंतर्गत पुलाला मंजुरी मिळून निधी बांधकामकडे वर्ग करण्यात आला. मात्र, बांधकाम विभागाची कार्यवाही धिम्यागतीने चालू असल्याने अद्याप निविदा अपूर्ण आहे. याबाबत ग्रामस्थांनी शनिवारी मुळस येथे उपोषण केले. हे उपोषण तीन दिवस चालले मात्र प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने उपोषणकर्त्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत होता.

उपअभियंता चव्हाण, भाजप तालुकाध्यक्ष प्रवीण गवस, शैलेश दळवी, राजेंद्र निंबाळकर राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेरकर, राष्ट्रवादी जिल्हा कमिटी अध्यक्ष बाबा खतीब हे उपस्थित होते.

अभियंत्यांनी दिली भेट

मंगळवारपर्यंत दखल न घेतल्यास रात्री-अपरात्री कोणत्याही वेळी जलसमाधी किंवा रास्ता रोको करण्याचा निर्धार केला होता. त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता माने यांनी उपोषणस्थळी यांनी भेट दिली. मार्च २०२१ पर्यंत पुलाची निविदा प्रसिद्ध करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्याने एक महिन्यासाठी उपोषणाला स्थगिती देत असल्याचे उपोषणकर्ते दत्ताराम देसाई, सचिन देसाई व उदय जाधव यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

 

Web Title: Question of Mulas Hewale Bridge: Fasting back three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.