पाण्याच्या प्रश्नावरून राजकारण नको

By admin | Published: December 22, 2014 12:20 AM2014-12-22T00:20:32+5:302014-12-22T00:20:32+5:30

नीतेश राणे : कणकवलीतील पाणीटंचाई आढावा बैठकीत आवाहन

The question of water is not politics | पाण्याच्या प्रश्नावरून राजकारण नको

पाण्याच्या प्रश्नावरून राजकारण नको

Next

कणकवली : पाणी हे जीवन आहे. त्यावरून कोणीही राजकारण करू नये. आमदार म्हणून माझ्या मतदारसंघातील प्रत्येक घरात २४ तास पाणी असावे ही माझी जबाबदारी आहे. त्यासाठी निश्चितच प्रयत्न करण्यात येतील. लोकप्रतिनिधी, अधिकारी तसेच प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद असणे आवश्यक असून त्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करा, असे आवाहन कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीतेश राणे यांनी केले.
येथील भगवती मंगल कार्यालयात रविवारी कणकवली तालुका संभाव्य पाणीटंचाई आढावा सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, पंचायत समिती सभापती आस्था सर्पे, उपसभापती भिवा वर्देकर, जिल्हा परिषद सदस्य मधुसूदन बांदिवडेकर, विभावरी खोत, पंचायत समिती सदस्य संतोष कानडे, महेश गुरव, संजय देसाई, दादा कर्ले, तहसीलदार समीर घारे, गटविकास अधिकारी चंद्रसेन मकेश्वर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता पी. एम. शिंदे, नायब तहसीलदार आर. जे. पवार यांच्यासह अन्य अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार नीतेश राणे म्हणाले, प्रत्येक नागरिकाला हक्काचे पाणी मिळणे हा त्याचा मुलभूत अधिकार आहे. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाई भासू नये यासाठी आजपासूनच नियोजन करणे गरजेचे आहे. पाणीटंचाईच्या संदर्भात शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील तसेच संबंधित प्रश्नांबाबत मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल. गावपातळीवर काम करणारे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी यांच्यामध्ये सुसंवाद असणे गरजेचे आहे. असा सुसंवाद असेल तरच विकासही निश्चितच होईल. त्यासाठी सर्वांनीच सकारात्मकपणे विचार करणे गरजेचे आहे. पाण्याचा प्रश्न सोडविताना कोणत्याही प्रकारचे राजकारण अथवा पक्षभेद करण्यात येणार नाही. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आपले नेहमीच प्रयत्न राहणार असून प्रशासनाचे तसेच आपलेही त्यासाठी सहकार्य आवश्यक असल्याचे आमदार राणे यांनी यावेळी सांगितले. सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले तर आभार गटविकास अधिकारी चंद्रसेन मकेश्वर यांनी मानले. रमाकांत राऊत, हेमंत परुळेकर, विजय भोगटे, बबलू सावंत, संजय पाताडे, प्रकाश भालेकर आदींनी विविध समस्या तसेच प्रस्ताव यावेळी मांडले. (वार्ताहर)

Web Title: The question of water is not politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.