मृगाची सलामी कोरडीच, लहरी हवामानामुळे बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: June 13, 2023 11:11 AM2023-06-13T11:11:34+5:302023-06-13T11:11:57+5:30

वरूणराजाच्या आगमनाकडे शेतकऱ्यांचे लक्ष

Rain delayed due to stormy weather, Farmers worried | मृगाची सलामी कोरडीच, लहरी हवामानामुळे बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले

मृगाची सलामी कोरडीच, लहरी हवामानामुळे बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले

googlenewsNext

वैभव साळकर 

दोडामार्ग : निसर्गाच्या लहरीपणामुळे कोकणात यंदाच्या मृगाने सलामी दिली ती कोरडीच! त्यामुळे मिरगाची पेरणी झालीच नाही. त्यामुळे लहरी हवामानाने बळीराजाच्या तोंडचे पाणीच पळविले. परिणामी पुढे तरी वरूणराजाची साथ लाभेल अशी आस लावून बळीराजा आकाशाकडे डोळे लावून आणि पुढील नक्षत्रांचा ठोकताळा बांधून आहे.

कोकणातील शेतकरी शेतीच्या कामांना खर तर एप्रिल महिन्याच्या अखेरपासूनच सुरुवात करतो. कोकणात पावसाळी शेतीपूर्वीची मशागतीची कामे तेव्हापासूनच सुरू होतात. मे च्या अखेरीस रोहिणी नक्षत्राने मान्सूनपूर्व ढगांची झलक दाखविल्यावर शेतकरी पावसाची आस आणि हंगामातील रास मनी धरतो. पुढे कोणते नक्षत्र आहे? त्याचे वाहन काय? ते कधी संपते याचा ताळमेळ मनात घोळत असतो. त्याला कारणही तसेच आहे. शेतकऱ्यांचा जेवढा हवामान खात्यावर विश्वास नाही तेवढा विश्वास पंचांग, नक्षत्र व त्यांची वाहने आणि जाणत्यांच्या दाखल्यावर असतो.

नक्षत्राच्या वाहनावरून पावसाचा अंदाज 

भारतीय पंचांगानुसार नक्षत्राचे वाहन हत्ती ,म्हैस ,बेडूक असल्यास दमदार पाऊस ,गाढव ,उंदीर असल्यास मध्यम तर घोडा व कोल्हा असल्यास विरळ पाऊस होतो असा अंदाज बांधला जातो.

यंदाचे नक्षत्र   तारीख        वाहन
    मृग             ७ जून            हत्ती
   आद्रा           २२ जून          मेंढा
   पुनर्वसू         ६ जुलै           गाढव
   आश्लेषा      ३औगस्ट        म्हैस
    मघा           १७ औगस्ट      घोडा
    पूर्वा           ३१ औगस्ट       मोर
    उत्तरा        १३ सप्टेंबर        हत्ती
    हस्त         २७ औगस्ट      बेडूक
    चित्रा         ११ औक्टोबर      उंदीर
   स्वाती         २४ औक्टोबर     घोडा

काय आहेत नक्षत्र आणि त्यांची वाहने ?

जून ते औक्टोबर दरम्यानची ११नक्षत्रे पावसाची समजली जातात. साधारणतः १४ दिवसांचा कालावधी एका नक्षत्राचा असतो. पावसाचे पहिले नक्षत्र मृग त्यांनतर आद्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा व स्वाती. शेवटची तीन नक्षत्रात परतीचा पाऊस सुरू होतो. खास अशा गणितीय सूत्रानुसार या नक्षत्रांचे ठरते. यात मेंढा, म्हैस, कोल्हा, उंदीर, घोडा, गाढव , बेडूक,  मोर असे प्रत्येक नक्षत्राचे वाहन असते.

Web Title: Rain delayed due to stormy weather, Farmers worried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.