सिंधुदुर्गात पाऊस पुन्हा सक्रिय, दिवसभर रिपरिप सुरू; सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: July 13, 2023 03:35 PM2023-07-13T15:35:00+5:302023-07-13T15:35:21+5:30

गेल्या चौवीस तासात सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद

Rains active again in Sindhudurg, Sawantwadi taluka recorded maximum rainfall | सिंधुदुर्गात पाऊस पुन्हा सक्रिय, दिवसभर रिपरिप सुरू; सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद

सिंधुदुर्गात पाऊस पुन्हा सक्रिय, दिवसभर रिपरिप सुरू; सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद

googlenewsNext

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने आज, गुरूवार (दि.१३) पासून पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार बुधवारी मध्यरात्रीपासूनच पावसाला सुरूवात झाली. गुरूवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती.

मागील चार ते पाच दिवस पावसाने पाठ फिरविल्याने भरडी शेतीला पाणी मिळताना अवघड बनले होते. त्यातच आता पुन्हा सक्रिय झाल्याने शेतीच्या कामांनी वेग घेतला आहे.

गेल्या चौवीस तासात सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक ५९.७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ३०.५ मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी १०८४.२ मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारीमध्ये आतापर्यंत देवगड- ३३.८ (१०५३.२), मालवण- २३.२ (१०८०.५), सावंतवाडी- ५९.७ (१२७२.५), वेंगुर्ला- ३५ (१०८४.३), कणकवली- १३.६ (९५०.८), कुडाळ- २५.३ (१०८२.५), वैभववाडी- १८ (१०४०.१), दोडामार्ग-४८.७ (११९७) असा पाऊस झाला आहे

Web Title: Rains active again in Sindhudurg, Sawantwadi taluka recorded maximum rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.