मालवण तालुक्याला पावसाने झोडपले, अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 10:35 AM2020-07-06T10:35:11+5:302020-07-06T10:36:32+5:30

मालवण तालुक्याला सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मालवण शहरातील रस्ते जलमय झाले होते. मसुरे, आचरा भागाला पावसाचा मोठा फटका बसला असून काही घरांना पाण्याने वेढा दिला आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या तडाख्याने पडझड होऊन नुकसान झाले आहे. मालवणात आतापर्यंत १९३५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Rains lashed Malvan taluka, causing flood conditions in many places | मालवण तालुक्याला पावसाने झोडपले, अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती

आचरा हिर्लेवाडी येथील गोरखनाथ पेडणेकर यांच्या घराला पाण्याचा वेढा पडल्याने घराला धोका निर्माण झाला आहे.

googlenewsNext
ठळक मुद्देमालवण तालुक्याला पावसाने झोडपले, अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थितीरस्ते जलमय, नदी किनारी भागातील घरांना धोका

मालवण : मालवण तालुक्याला सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मालवण शहरातील रस्ते जलमय झाले होते. मसुरे, आचरा भागाला पावसाचा मोठा फटका बसला असून काही घरांना पाण्याने वेढा दिला आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या तडाख्याने पडझड होऊन नुकसान झाले आहे. मालवणात आतापर्यंत १९३५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसाने मालवण तालुक्याला चांगलेच झोडपले. नदी-नाल्यांना पूर आला असून काही ठिकाणी शेती पाण्याखाली गेली आहे. मसुरे, आचरा येथे काही घरांना पाण्याने वेढा दिला आहे. तर अनेक ठिकाणी घरावर झाडे पडून मोठे नुकसान झाले.

हिर्लेवाडी येथील गोरखनाथ पेडणेकर यांच्या घराला पाण्याचा वेढा पडल्याने घराला धोका निर्माण झाला आहे. मुसळधार पावसाने आचरा पारवाडी नदीला पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. किनारी भागातील भातशेती पाण्याखाली गेली आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास नदी किनारी भागातील घरांना धोका निर्माण होऊ शकतो.

चिंदर देऊळवाडी येथील वयोवृद्ध दत्ताराम कदम आणि त्यांची पत्नी घराबाहेर असतानाच घराचे छप्पर कोसळल्याने वासे, मातीच्या भिंती कोसळून सुमारे ३२ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले. आचरा हिर्लेवाडी येथील संजय खडपे यांच्या घर आणि बाथरुमवर विलास मुणगेकर यांचा माड शुक्रवारी सायंकाळी मोडून पडल्याने त्यांचे सुमारे ६ हजारांचे नुकसान झाले. याबाबत उपसरपंच पांडुरंग वायंगणकर, आचरा तलाठी काळ यांनी पंचयादी घातली.

झाड पडून मोठे नुकसान

४शनिवारी दुपारी आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आचरा शेखवाडा येथील मुश्ताक साकीम शेख यांच्या राहत्या घरावर लगतच्या परसातील आंब्याचे झाड पडून मोठे नुकसान झाले. यावेळी घरात शरीफा मुश्ताक शेख, अल्मार शेख, दिलावर शेख, बशीर नसीम काझी हे होते. पण आवाज झाल्याने ते घराबाहेर पळाल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही. मात्र, छपराचे नुकसान झाल्याने घरात पाणी साचले.

 

Web Title: Rains lashed Malvan taluka, causing flood conditions in many places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.